Posts

Showing posts from July, 2024

महापालिका चांगले रस्त्ये देवु शकत नाही,तर नागरी सुविधा काय देणार- उमेश भवड

Image
  कळंबा ( वार्ताहर ): ऐन पावसाळ्यात कोल्हापुरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. याच्या निषेधार्थ कळंबा ग्रामस्थांच्या वतीने सामाजीक कार्यकर्ते उमेश भवड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. कळंबा येथील साई मंदिर परिसरामध्ये रस्त्यांची अक्षरशा चाळण झालेली आहे. कोल्हापूर गारगोटी मार्गावर साई मंदिर येथे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या सभोवताली रांगोळी काढून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी बोलताना उमेश भवड यांनी महापालिका नागरिकांना चांगले रस्ते देऊ शकत नाहीत, तर हद्दवाढ झाल्यानंतर प्रस्तावीत हद्दवाडीतील गावांना काय नागरी सुविधा देणार असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी महापालिकेच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तसच हद्दवाढ विरोधातही घोषणाबाजी केली.या आंदोलनामध्ये ग्रामपंचायत सदस्य दीपक तिवले, संजय जाधव, योगेश तिवले,सागर,पडळकर,  विश्वजीत बगाडे,विकास भवड, दयानंद शिंदे,नामदेव साळोखे,रोहित तीवले,भिकाजी चव्हाण,सुशांत कुंटे,पप्पू तीवले पांडुरंग खानविलकर, अक्षय भवड,विकी टिपूगडे,सुनील पडळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.