Posts

Showing posts from May, 2026

वार्ड तिथे शाखा-शिवसेनेच्या उपक्रमाचा धडाक्यात शुभारंभ...

Image
 कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने ताराबाई पार्क येथे शाखेचा शुभारंभ   कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनेची शाखा म्हणजे शिवसैनिकांची शान,मान,अभिमान असतो. शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य केली जातात, लोकांच्या  अडीचणींची निरासरण केले जाते हीच परंपरा अशीच अखंडीतपणे सुरु रहावी अशी अपेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केली.ते कोल्हापूरातील ताराबाई पार्क येथील शाखेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.ही शाखा शिवसेना शहर प्रमुख मंजित माने यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली आहे.याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, सगळ्या शिवसैनिकांनी  संकटकाळी आपली जबाबदारी समजून एकत्र येणे गरजेचे असुन शाखांच्या माध्यमातुन शिवसेनेचे संघटन मजबुत करणे ही काळाची गरज आहे.तर शहर प्रमुख मंजित माने यांनी येणाऱ्या सहा महिन्यात शहर प्रमुख या नात्याने वार्ड तेथे शाखा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी अनेक पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्रे देखील देण्यात आली. याप्रसंगी सह संपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळुंखे,स्मिता सावंत, रीमा देशपांडे, पप...

पुण्यात विषारी दारुचा कहर,तब्बल बावीस जणांचा मृत्यू..

Image
 पुण्यात विषारी दारुचा कहर,तब्बल आठराजणांचा मृत्यू पुणे (प्रतिनिधी): पुण्यात विषारी दारू ने कहर केला असून पुण्यात गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड  आणी हडपसर येथे गावठी दारू पिल्यामुळे तब्बल बावीसजणांचा मृत्यू झाला आहे, यामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला  आहे.विषारी दारूच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईच्या आदेश दिले आहेत.दरम्यान विषारी दारु प्रकरणी पोलीसांनी तपासाची सुत्रे जलदगतीने फीरवली असुन योगेश वानखेडे या तरुणास अटक केली आहे. कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज पोर्टलवर बातम्या देण्यासाठी-8483899521आणी 9326499921 या मोबाईल नंबरवर संपर्क करा

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातुन एल्गार...

Image
 मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरातुन एल्गार... कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. आज सकल मराठा बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी हा पाठिंबा दर्शवला.यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी  कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आग्रही भुमीका मांडली.तर मराठा योध्दे बाबा इंदुलकर यांनी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ई मेल व्दारे पाटवल्याची माहीती दिली.याप्रसंगी मराठा बांधवांनी घोषणा देत परीसर दणाणुन सोडला. कोल्हापूरातील दसरा चौकात झालेल्या पत्रकार परीषदेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, राष्ट्रीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष सागर चौगले, मराठा योध्दे दिलीप देसाई,बाबा पार्टे, गणी आजरेकर ,अनिल घाटगे,राज बडकस,काका पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

कोल्हापूरातील माजी विद्यार्थ्यांकडून शेणीदान उपक्रम..

Image
 कोल्हापूरातील माजी विद्यार्थ्यांकडून शेणीदान उपक्रम.. कोल्हापूर (प्रतिनिधी): वय वर्ष ६० ते ६५ वयोगटातील विद्यार्थी एकत्र आलेत.. मात्र तरुणांना लाजवेल असा उत्साह, थट्टा- मस्करी,जुन्या आठवणींना उजाळा देत प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संचलित महाराष्ट्र हायस्कूलच्या सन १९७३-७४ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एवढेच नव्हे तर  महाराष्ट्र हायस्कूलच्या या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पंचगंगा स्मशानभूमीस तब्बल दहा हजार शेणी अर्पण केल्या. त्याचबरोबर मतिमंद मुलांना देखील मदत केली. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी जाग्या केल्या. यावेळी एकमेकांची आदरपूर्वक विचारपूस करत या माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. या स्नेह मेळाव्यास शिवसेना महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव,किशोर पारखे, संजय मंडलिक, कैलास माने, गजानन पोवार, श्रीकांत पौंडकर, रवींद्र साळुंखे,शिरीष साळोखे,किशोर पन्हाळकर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

साईराज जाधवची कळंब्यात जल्लोषी मीरवणुक...

Image
 साईराज जाधवची कळंबा गावात जल्लोषी मिरवणुक.. कळंबा (प्रतिनिधी): पुणे जिल्हा पोलीस दलामध्ये करवीर तालुक्यातील कळंबा येथील साईराज युवराज जाधव याची निवड झाल्याबद्दल कळंब्यातील नागरिकांनी त्याची जल्लोषी मिरवणूक काढली. यावेळी अनेक मान्यवरांनी  साईराज जाधव याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, माजी सरपंच सागर भोगम, उत्तम जाधव, अरुण टोपकर, बाजीराव पोवार, उमेश भवड, सुरेश नाईक, प्रकाश कदम, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थीती होती.तर मीरवणुकीमध्ये उपसरपंच रोहीत जगताप, दीपक तिवले, छाया भवड, भाग्यश्री पाटोळे, रोहित मिरजे,पुनम जाधव, संदीप पाटील, स्नेहल जाधव,विकास पोवार, मीना गौड, नितीश शिंदे, स्वरूप पाटील, दिपाली रोपळकर,वैशाली टिपुगडे, उदय जाधव, आशा टिपुगडे ,संगीता माने ,ग्रामसेवक विलास राबाडे गावातील विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कळंबा यात्रेला उत्सवाचे स्वरुप..

Image
 कळंबा गावच्या यात्रेला उत्सवाचे स्वरुप,राज्यभरातुन हजारो भावीकांची देवीच्या दर्शनासाठी उपस्थीती.. कळंबा (प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टी कोनातून वसलेले गाव म्हणजे 'कळंबा' हे होय. कळंबा गावाला अख्यायिका असून करवीर महात्म्यात कोल्हासूर राक्षसाने कात्यायनीच्या डोंगरावर श्री महालक्ष्मी देवीची उपासना केली होती. कोल्हासूर श्री महालक्ष्मी देवीचा निस्सीम भक्त होता, एक दैत्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास देत होता. या दैत्याचा वध श्री महालक्ष्मी देवीच्या वरदानाने कोल्हासूराने केला. या कोल्हासूराच्या पत्नीचे नाव कळंबादेवी, कळंबा देवीला तीन पुत्र होते. त्यातील एक पुत्र करवीरासूर हा होता. त्यामुळेच कोल्हापूरला करवीरनगरी असे संबोधले जाते. त्यानंतर करवीराचा माता व कोल्हासूराची पत्नी कळंबादेवी हिचे स्थान म्हणून कळंबा गाव निर्माण झाले.पूर्वी कात्यायनी शेजारी बालिंगा गाव होते.ह्या गावाच्या खालच्या बाजुला कळंबा तलावास लागुन जुन्या कळंबा गाव होते. गावात कळंबा देवीचे छोटेसे दगडी बांधकाम असलेले मंदीर होते. ते आजही त्या ठिकाणी असून विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी स्वयं...

कोल्हापूर ब्रेकिंग चॅनेलवरील "आमचा कळंबा" या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद,

Image
 कोल्हापूर ब्रेकिंग चॅनेलवरील 'आमचा कळंबा' या विशेष कार्यक्रमास कळंबा गावच्या नागरीकांचा उदंड प्रतिसाद. कोल्हापूर ( प्रतिनिधी): अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनेलवर श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त "आमचा कळंबा" हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम कळंबा गावातील नागरीकांच्या पसंतीस उतरला असून या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन कळंबा गावची संस्कृती,मंदिराचा जिर्णोद्धार,श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या यात्रेचा इतिहास,गावची आध्यात्मिक माहिती,  कळंबा गावच्या रूढी- परंपरा,क्रिडा व सांस्कृतीक वाटचालीचा आढावा घेण्याचा प्रयत्न कोल्हापूर ब्रेकिंगचे मुख्य प्रतिनिधी सागर चौगले यांनी केला आहे. या कार्यक्रमामध्ये कळंबा गावातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या असुन या मुलाखतीतून १९७० सालापासूनचा कळंबा गावचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंबा यात्रेनिमित्त प्रथमच कोल्हापूर ब्रेकिंगने एक यशस्वी प्रयत्न केल्यामुळे कोल्हापूर ब्रेकिंग चॅनेलचे कौतुक होत आहे.तर सागर चौगले यांनी देखील को...

आमदार सतेज पाटील-महाडिक गट एकत्र येणार?

Image
 आमदार सतेज पाटील-महाडीक गट एकत्र येणार? कोल्हापूर : ‘बंटीसाहेब तुम्ही आणि महाडिक एकत्र येणार आहे, अशी कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे, त्यातील खरे काय?’ असा चिमटा माजी आमदार के. पी. पाटील यांनी काढल्यानंतर ‘जर तुम्ही व ए. वाय. पाटील एकत्र येत असाल तर मग ‘बंटी व महाडिक’ का नाही? असे रोखठोख उत्तर आमदार सतेज पाटील यांनी दिल्याने उपस्थीतांना चांगलाच धक्का बसला. कोल्हापूर बाजार समितीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर आदींची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीनंतर या नेत्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली, याची जिल्हाभर चर्चा रंगली आहे.'गोकुळ’च्या राजकारणाचा संदर्भात देत सतेज पाटील यांच्याकडे पाहत, ‘बरे केले, आमच्यात भांडणे लावून तुम्ही मजा बघत बसलाय’ असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. ‘माझे काय नाही, तुमचे महायुतीचे जोरात सुरू आहे, माझ्या तुमच्या महायुतीला शुभेच्छा आहेत’, असे आमदार सतेज पाटील म्हणताच, आम्ही महायुती म्हणूनच ‘ग...

'संवाद प्रतिवाद'चे अनावरण उत्साहात संपन्न..

Image
 'संवाद प्रतिवाद'चे अनावरण सोहळा उत्साहात संपन्न.. कळंबा (प्रतिनाधी): करवीर तालुक्यातील कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त संवाद प्रतिवाद या वृत्तपत्राने विशेष अंक प्रसिद्ध केला आहे. या विशेष अंकाचे अनावरण माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक स्वरूप कदम, विजेंद्रसिंह माने, राजू पागर ,वैभव माने ,प्रमोद देसाई, अभिषेक जाधव, महेश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम, गव्हर्मेंट सर्व्हंट बँकेचे संचालक शशिकांत तीवले, कळंबा ग्रामपंचायतची सदस्य दीपक तिवले,सामाजिक कार्यकर्ते बाजीराव पोवार, उत्तम जाधव, प्रकाश कदम, राज युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अरुण पाटील टोपकर, भारत पाटील यांनी केले. यावेळी बोलताना संवाद प्रतिवादचे कार्यकारी संपादक सागर चौगले यांनी या विशेष अंकामध्ये कळंबा गावच्या यात्रेचा  इतिहास मांडण्याचा प्रयत्न  करण्यात आला असून श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे महात्म्य सांगण्यात आले आहे असे नमूद केले .तर यावेळी सत्य...

कै.रामभाऊ दादा चव्हाण फाऊंडेशनच्यावतीने सामाजीक उपक्रम

Image
 रामभाऊ दादा चव्हाण यांच्या जयंती निमित्त गरजू रुग्णाला आर्थिक मदत  कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्वर्गीय रामभाऊ दादा चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी रामभाऊ दादा चव्हाण फाउंडेशनच्या वतीने गरजू रुग्णाला आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधीलकी जपण्यात आली. 1986 पासून रामभाऊ दादा चव्हाण यांनी कोल्हापुरात शिवसेना पक्ष रुजवला अनेक शाखांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत पकड त्यांनी निर्माण केली होती रामभाऊ दादा चव्हाण यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आज आकरा मे त्यांच्या जयंतीचे औश्चीत्यसाधुन  कोल्हापूर शहरातील दोन्ही किडण्या निकामी झालेल्या रोहीत मुसळे या तरुणाला आर्थिक मदतीचा धनादेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि अजित चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे संस्थापक आणि नगरसेवक प्रसाद चव्हाण, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण,फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत दुबल, जय चव्हाण, यश चव्हाण, अभिजीत गायकवाड ,गणेश रांगणेकर, विकास साळुंखे, रोहित माने, अकाराम पाटील,शरद नागवेकर, ज्य...

वि कृ वरुटे यांचे निधन..

Image
 *विद्यापीठ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक  वि. कृ. वरुटे  यांचे दु:खद निधन* दिनांक:- ७ मे, २०२६ कोल्हापूर ( प्रतिनिधी): विद्यापीठ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, भूगोल विषयाचे नामांकित शिक्षक वि. कृ. वरुटे यांचे  दु:खद निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते. भूगोल हा जरी त्यांचा अध्यापनाचा मुख्य विषय असला तरी शारीरिक शिक्षणाची पदविका त्यांनी घेतली असल्याने शारीरिक शिक्षण आणि जिमखान्याच्या सर्व उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. वारकरी संप्रदायाचे वरुटे घराण्याचे संस्कार  त्यांनी आयुष्यभर जपले  होते. कोल्हापुरातील ' पश्यंती ' या अध्यात्मिक केंद्रात ते क्रियाशील होते. अतिशय नम्र, संवेदनशील, संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक असा त्यांचा नावलौकिक होता. विद्यापीठ हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त  झाल्यावर त्यांनी अध्यात्मिक वाचन, चिंतन-मनन आणि लेखन यात स्वत: ला गुंतवून घेतले होते. विद्यापीठ हायस्कूलचे सर्व आजी- माजी शिक्षक , विद्यार्थी यांनी  वरुटे यांच्या निधनांतर शोक व्यक्त केला.

कोल्हापूरात रायफल शुटिंग स्पर्धेचा शुभारंभ..

Image
 कोल्हापूर शहरशिवसेनेच्या वतीने भव्य रायफल शूटिंग स्पर्धेचा शुभारंभ   कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून, कोल्हापूर शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने,  भव्य रायफल शूटिंग स्पर्धा घेण्यात आल्या.या रायफल शूटिंग स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरुवात झाली, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून  कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख  अरुण दुधवडकर हे होते, या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख मंजित माने यांनी केले होते, या स्पर्धेत साधारण 75 स्पर्धकांनी भाग घेतला आहे.ही स्पर्धा 3 दिवस सुरु राहणार आहे.यामध्ये प्रत्येक गटामध्ये एक विजेता निवडला जाणार आहे.ही रायफल शूटिंग स्पर्धा शिवाजी पेठेतील स म लोहिया कॉलेज नजीक पेटाळा ग्राउंड येथील शूटिंग रेंज वर पार पडणार आहे.यावेळी बोलताना संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर म्हणाले, की शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असणारे कार्यक्रम येत्या महिन्यात शिवसैनिक घेणार आहेत,तसेच शहर शिवसेनेच्या वतीने मंजित माने यांनी आयोजित केल...