Posts

Showing posts from June, 2025

नागरिकांचा संताप! बापूरामनगर मेन रोडची दुरवस्था, सांडपाणी घरात; नागरिकांची तीव्र मागणी – "रस्ता त्वरित करा, अन्यथा आंदोलन अटळ!"

Image
 रविवार, दिनांक २२/०६/२०२५ रोजी प्रभाग क्र. ७९, सुर्वेनगर येथील बापूरामनगर मेन रोडवरील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेला जाब विचारला. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कोणतेही काम न झाल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मागील वर्षी पावसाळ्यात श्री शिवराज पाटील (दादा) सोशल फाउंडेशन यांनी स्वखर्चातून खड्डे मोजले होते. मात्र, महानगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे सांडपाणी घरात घुसत असून डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढत आहे. नागरिकांनी रस्ता त्वरित दुरुस्त करावा व गटारी स्वच्छ करून पाण्याचा निचरा करावा, अन्यथा आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. उपस्थित: श्री विजयकुमार कांबळे, श्री योगेश पाटील, पंकज वाघमारे, सागर फुटाणे, प्रमोद पाटील, मालेकर सर, बाबुराव जाधव, आदित्य गुरव, जयसिंग वडगावकर, सुधीन बनगे आणि परिसरातील नागरिक.

सविता पाटील यांचा पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने सत्कार.

Image
  कोल्हापूर (प्रतिनिधी ): कोल्हापूरातील शिवाजीपेठ इथल्या पद्माराजे ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या व पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पदी सविता राजेंद्र पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाली.यानिमीत्य कोल्हापूरातील पद्माराजे महीला संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सरीता सासने यांच्या हस्ते सविता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.सविता पाटील या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस च्या संचालिका व डी बी पाटील शैक्षणिक व समाजिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी स म लोहिया हायस्कूल व न्यू हायस्कूल या ठिकाणी तब्बल 32 वर्षे सेवा बजावली आहे.  रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या त्या माजी अध्यक्षाही आहेत.याप्रसंगी सरीता सासने यांनी पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी पद्माराजे महीला संघटनेच्या सचिव आरती वाळके,सदस्या शशिकला गवळी,अर्पिता पावले उपस्थीत होत्या.

भाजपाच्या वतीने मोफत कॅम्पचे आयोजन

Image
  कोल्हापूर ( प्रतिनिधी ):भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ आप्पा लाड यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातील रामानंदनगर येथे मोफत आधार कार्ड, नवीन मतदारांची नोंदणी, उत्पन्नाचा दाखला,    रहिवासी दाखला,    डिजिटल रेशन कार्ड    याचा कॅम्प भरवण्यात आला होता. यावेळी    भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश चिटणीस महेश जाधव,महीला जिल्हा अध्यक्षा रुपाराणी निकम,उपाध्यक्षा सरीता चौगले,वैशाली सुतार यांची प्रमुख उपस्थीती होती.या कॅम्पचा लाभ परीसरातील शेकडो नागरीकांनी घेतला.यावेळी विजय यादव,विवेक पिष्ठे,अतुल निंबाळकर,अशोक लोहार,संगीता तांबे,राणी गायकवाड,संगीता सुतार,प्रबोधिनी हार्डीकर,सचिन सुराणा उपस्थीत होते.