कोल्हापूर (प्रतिनिधी ): कोल्हापूरातील शिवाजीपेठ इथल्या पद्माराजे ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या व पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पदी सविता राजेंद्र पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाली.यानिमीत्य कोल्हापूरातील पद्माराजे महीला संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सरीता सासने यांच्या हस्ते सविता पाटील यांचा सत्कार करण्यात आला.सविता पाटील या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस च्या संचालिका व डी बी पाटील शैक्षणिक व समाजिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी स म लोहिया हायस्कूल व न्यू हायस्कूल या ठिकाणी तब्बल 32 वर्षे सेवा बजावली आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या त्या माजी अध्यक्षाही आहेत.याप्रसंगी सरीता सासने यांनी पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी पद्माराजे महीला संघटनेच्या सचिव आरती वाळके,सदस्या शशिकला गवळी,अर्पिता पावले उपस्थीत होत्या.
Comments
Post a Comment