Posts

Showing posts from January, 2026

शेतकर्‍याची लेक म्हणून निवडूण द्या-विनिता भोगम..

Image
 कळंबा(प्रतिनिधी): जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शेतकरी वर्ग मात्र शेती  मशागतीच्या कामात व्यस्त आहे.यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार विनिता भोगम या चक्क शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन आपला प्रचार करत आहेत. विनिता भोगम ह्या सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकरी वर्गाशी त्यांची पुर्वीपासुनच नाळ जुळली आहे.यामुळे शेतकरी वर्गातून विनिता भोगम यांना उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्याची लेक म्हणून जिल्हा परिषद सदस्या म्हणून एकदा संधी द्या..मी नक्कीच शेतकरी वर्गासाठी विकासात्मक धोरणे राबविन असा आपुलकीचा प्रचार विनिता भोगम करत असल्यामुळे शेतकरी वर्गातून देखील त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

शिंगणापूर पंचायत समीती मतदारसंघाचा कायापालट करणार-अमर जञाटे

Image
 बालींगा(प्रतिनिधी): शिंगणापूर पंचायत समितीचे भाजप, राष्ट्रवादी, जनसुराज्य, आरपीआय युतीचे उमेदवार अमर जत्राटे यांना शिंगणापूर, नागदेववाडी,बालींगा,दोनवडे, या गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मीळत आहे. प्रचारा दरम्यान अमर जत्राटे हे  स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांच्या आशीर्वादाने आणी  मंत्री चंद्रकांतदादा पाटील,खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतुन राहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर,नागदेववाडी येथील नागरी समस्या सोडवून या  गावांचा कायापालट करु असे  नागरीकांना अभिवचन देत आहेत.तसेच अमर जञाटे यांनी आता पर्यंत केलेले सामाजीक कार्य आणी सामाजीक प्रश्नांवर केलेली आंदोलने पाहून शिंगणापूर पंचायत समीती मतदारसंघातील नागरीकांचा मोठा पाठींबा मीळत आहे.

विनिता भोगम यांचा घर टू घर प्रचार...

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीकडून भाजपच्या कमळ या चिन्हावर विनिता सागर भोगम या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत.विनिता भोगम  यांनी घर टु घर प्रचारावर भर दिला आहे.संयमी,शांत स्वभावाच्या विनिता भोगम यांना सामाजीक प्रश्नांची जाण असल्यामुळे जनतेतुन त्यांना मोठा प्रतिसाद मीळत आहे.विशेष म्हणजे कळंबा मतदार संघातील महीला वर्ग विनिता भोगम यांच्या प्रचारात हिरीहिरीने सहभागी होत आहेत.कळंबा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणारा आश्वासक चेहरा म्हणून अल्पावधीतच ओळख निर्माण करण्यात विनिता भोगम यशस्वी झाल्यामुळे त्यांचा विजय निश्चीत मानला जात आहे.

अमर जत्राटेंना नागरीकांचा वाढता पाठींबा...

Image
 बालिंगा(प्रतिनिधी): शिंगणापूर पंचायत समिती मतदार संघाचे भाजप, राष्ट्रवादी, जनसुराज्य, आरपीआय युतीचे उमेदवार अमर जत्राटे हे कमळ या चिन्हावर निवडणुकीच्या रींगणात आहेत. शिंगणापूर पंचायत समिती मतदार संघामध्ये बालींगा,नागदेववाडी,शिंगणापूर,दोनवडे ही गावी येत असून प्रचाराच्या दरम्यान अमर जत्राटे यांना विजयी गुलाल लागेल असं चित्र पहावयास मिळत आहे. अमर जत्राटे यांनी विकासात्मक प्रचारावर भर दिल्याने नागरिकांचा त्यांना पाठिंबा वाढत आहे. तसेच शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघातील असणाऱ्या समस्या सोडवण्याचे   अभिवचन अमर जत्राटे मतदारांना देत असल्यामुळे मतदारांचा कल अमर जत्राटे यांच्याकडे वाढत असल्याचे दिसुन येत आहे.

विनिता भोगम यांच्या प्रचारात महायुतीचे सर्व कार्यकर्त्ये सक्रीय..

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांना कळंबा गावात मोठा प्रतिसाद मिळत आहे. कळंबा गावातील महायुतीचे सर्व कार्यकर्त्ये विनिता भोगम यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.कळंबा गावातील महायुतीचे प्रमुख नेते कार्यकर्ते दररोज संध्याकाळी गावामध्ये प्रचार फेरी काढत आहेत. तसेच विनिता भोगम यांची  निवडणूक लढवण्यामागची विकासात्मक भूमिका स्पष्ट करणारी माहीती पत्रके देखील घरोघरी देत आहेत. कळंबा गावचे पहिले लोकनियुक्त सरपंचपद सागर भोगम यांनी भूषवले होते. या कार्यकाळात सागर भोगम यांनी अनेक विकास कामे केली आहेत. याचा फायदा विनिता भोगम यांना नक्कीच होणार आहे.कळंबा गावातील मतदार विनिता भोगम यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलतील असा विश्वास महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे.

कळंबा पचायत समीती मतदार संघात चर्चेचा विषय...

Image
 कळंबा (प्रतिनिधी): भावा आपल्या हक्काच्याच माणसाला मतदान करायचं..म्हणजेच पंकज गुरवलाच मतदान करायच असं सांगत कळंबा पंचायत समीतीसाठी कळंबा गावातील तरुणांनी एकञ येत  पंकज पांडुरंग गुरव या सामाजीक कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रींगणात उतरवले आहे.  पंकजच्या मित्र परिवाराने एकत्र येत वर्गणी काढून त्याला कळंबा पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. जग या चिन्हावर पंकज गुरव निवडणूक लढवत आहे. आज  त्याच्या प्रचाराचा शुभारंभ कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी महिलांची संख्याही लक्षणीय होती. यामुळे पंकज गुरवची उमेदवारी हा एक कळंबा पंचायत समिती मतदार संघात चर्चेचा विषय बनली आहे.

पाचगावमध्ये संग्राम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ...

Image
 पाचगाव (प्रतिनिधी): पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांचा पाचगाव येथील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.पाचगावचे ग्राम दैवत श्री भैरवनाथ मंदीरात माजी आमदार ऋतुराज पाटील आणी  गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच पदाच्या कार्यकाळात संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांनी पाचगाव मध्ये केलेल्या विकास  कामाची  पोचपावती म्हणून संग्राम पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदार निवडून देतील असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाने, दिलीप जाधव, नारायण गाडगीळ यांच्यासह महीला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनिता भोगम यांनाच निवडुण देण्याचा नागरीकांनी केला निर्धार...

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार  संघातील महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांचा मतदारसंघांमध्ये झंजावती प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्या प्रचारामध्ये युवकांच्या बरोबरच महिला देखील मोठ्या संख्येने सामील होत आहेत. विनिता भोगम या प्रचारादरम्यान मतदारसंघात येणाऱ्या गावातील समस्या जाणून घेत आहेत. तसेच मतदारांनी संधी दिल्यास त्या समस्या सोडवण्याचे अभिवचन मतदारांना देत आहेत. कळंबा मतदार संघाच्या विकासाच्या मुद्यावरच विनिता भोगम यांनी भर दिल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे.तसेच सागर भोगम यांनी केलेल्या केलेले सरपंचपदाच्या काळातील विकास कामे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावांमध्ये सुपरिचित असल्यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील नागरीकांनी महायुती कडून भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणुक लढवत असलेल्या विनिता भोगम यांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार केल्याचे चिञ कळंबा मतदार संघात दिसुन येत आहे.

अनेक सामाजीक प्रश्नांवर आंदोलन करणारा आक्रमक आंदोलक-अमर जत्राटे

Image
 कोल्हापूर ब्रेकिंग(मुख्य प्रतिनिधी-सागर चौगले) कोल्हापूर : तीस वर्षांपूर्वी जर कोणी विचार केला असता तर कोल्हापूरच्या राजकारणामध्ये भाजप नंबर एक पक्ष होईल अस कुणालाही वाटल नसते.  कारण त्यावेळी भाजपची ताकद अतिशय नगण्य अशी होती. त्यावेळी भाजपकडे मोजकेच पण कट्टर कार्यकर्ते होते. अशाच कट्टर कार्यकर्त्यांपैकी करवीर तालुक्यातील बालींगा गावातील  एक नाव म्हणजे अमर मारुती जत्राटे होय... अमर जत्राटे यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच भाजपच्या विचारसरणीवर आपली वाटचाल सुरू  केली. त्यांनी बालिंगा गावचे उपसरपंचपद ही भूषवलं..  अन्याय अत्याचाराच्या विरोधात कायम रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता अशी अमर जत्राटे यांची संपूर्ण तालुक्याला ओळख होती. वीज दरवाढ, शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न, बालिंगा पुलाचे प्रश्न,  गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा प्रश्न असोत कींवा रस्ते ,लाईट पाणी यासारख्या समस्या सोडवण्यासाठी केलेली आंदोलने असोत एवढेच न्हवे तर मराठा आरक्षण आंदोलनातही त्यांनी लक्षवेधक भुमीका बजावली.कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात सहभाग घेवुन फुलेवाडी टोल नाका फोडण्यात व वीज दरवाढी विरोध...

अजितदादांचा काय होता आजचा दौरा...

Image
 बारामती: प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेत अजितदादांसह विमानातील एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना हा अपघात घडला. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी ७ वाजता मुंबईहून ८ आसनी चार्टर्ड विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या आज चार प्रमुख सभांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाला भीषण अपघात झाला. अपघातात ६ जणांचा मृत्यू डीजीसीएने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील कोणालाही वाचवता आले नाही. मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे: अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) विदीप जाधव (सुरक्षा रक्षक – PSO)...

पाचगाव मतदार संघात संग्राम पाटील यांना वाढता पाठींबा..

Image
 पाचगाव(प्रतिनिधी): पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संग्राम गोपाळ पाटील  यांना पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावातून पाठिंबा वाढत आहे. संग्राम पाटील यांनी वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला असून त्यांना नागरिकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. संग्राम पाटील यांनी पाचगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले आहे. सरपंचपदाच्या कार्यकाळात पाचगाव मध्ये अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत.केलेल्या विकास कामांच्या जोरावरच संग्राम पाटील यांना सर्व स्थरांतुन पाठींबा वाढत असुन संग्राम पाटील यांनी विकासाच्या मुद्यावरच प्रचारात भर दिला आहे.

अमर जत्राटे यांचा धार्मीक कार्यातील सहभाग कौतुकास पात्र.

Image
 बालिंगा (प्रतिनिधी): शिंगणापूर पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात असणारे बालिंगा गावचे सुपुत्र अमर जत्राटे यांचे सामाजिक कार्य संपूर्ण करवीर तालुक्याला परिचित आहेच. शिवाय त्यांचा धार्मिक कार्यात देखील हिरीरीने भाग असतो. अमर जत्राटे बालिंगा गावचे ग्रामदैवत श्री कात्यायणी मंदीर देवस्थानाचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तसेच नवरात्र उत्सव नऊ दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यात अमर जत्राटे यांचा सिंहाचा वाटा असतो. एवढेच नव्हे तर बालिंगा गावात दरवर्षी स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी ते महाप्रसादाचे आयोजन करतात. यामुळे कात्यायणी देवी बरोबरच स्वामीभक्त असणारे अमर जत्राटे यांच्या धार्मीक कार्यातील असलेला सहभाग देखील कायमच कौतुकास पात्र ठरला आहे.

कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात विनिता भोगम यांना वाढता पाठींबा..

Image
 कळंबा (प्रतिनिधी): महायुतीच्या उमेदवार विनिता भोगम यांना कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणूकीमध्ये सर्वच गावातून पाठिंबा वाढत आहे.कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात येणाऱ्या कळंबा गावासह कंदलगाव, गिरगाव, कोगील खुर्द ,कोगील बुद्रुक, हणबरवाडी, दिंडनेर्ली, दर्‍याचे वडगाव,नंदगाव, खेबवडे, नागाव या सर्व गावातील महायुतीचे नेते, कार्यकर्ते विनिता भोगम यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. यामुळे विनिता भोगम यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.विनिता भोगम यांचे पती सागर भोगम यांनी कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले आहे.सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकास कामांची पोचपावती म्हणून विनिता भोगम यांना महायुतीकडून भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी विनिता भोगम यांनाच निवडून द्या अशा विकासात्मक मुद्द्यावर  प्रचारात भर देण्यात आला आहे.

कोल्हापूरकरांनी केला सुर्यनमस्कार..

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त कोल्हापूरातील रंकाळा तलाव येथे  ' आम्ही कोल्हापूरी' सेल्फी पॉईंट जवळ पतंजली योग परिवारातर्फे सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके करण्यात आलीत.यावेळी कोगनोळी येथील सूर्यदूत म्हणून सुपरीचीत असलेले  युवराज माने व त्यांच्या सौभाग्यवती  मिना माने उपस्थित होत्या.युवराज माने यांनी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षीके करून दाखवली.याप्रसंगी १०८ सूर्य नमस्कार करण्यात आले.यावेळी  संदीप खोत,दिपक पाटील,प्रशांत आयरेकर यांचा सत्कार करणेत आला.कार्यक्रमाला पश्चीम महाराष्ट प्रभारी चंद्रशेखर खापणे जिल्हा किसान प्रभारी  अशोक पालकर, पद्माराजे फौंडेशनच्या अध्यक्षा सरिता सासणे,सुरेंद्र सबनिस, शांताराम पाटील, मनोहर मोरे, अजीत मोरे,  योगशिक्षक विलासराव देशमुख,मधुसुदन तांबेकर, मारुती शिंदे,संजय पाटील, स्वप्नील भस्मे,सुजाता भोसले,सुरेखा साखळकर,शोभा मीठारी  तसेच योगसाधक योग साधिका मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.      

कोल्हापूरात केली जात आहे पारंपारीक खेळांची जोपासना..

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): सध्याच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये लहान मुलं,मुली, महिला, युवा पिढी ही मोबाईल मध्ये गुंग असते. यामुळे जे पारंपारिक खेळ आहेत ते लोप पावत चालले आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लहान मुली, महिला,अबाल वृद्धांसाठी पारंपारिक खेळाचं दरवर्षी आयोजन करण्यात येते.यामध्ये काचा कवड्या , बिट्या , जिबलि , लगोरी , दोरी उड्या, रस्सीखेच , आंधळी कोशिंबीर, तळ्यात मळ्यात, आईच पत्र हरवलं अशा अनेक पारंपरिक खेळांचा समावेश असतो. या खेळामध्ये दहा वर्षाच्या मुली पासून ते ८० वर्षाच्या आजीबाई पर्यंतच्या सर्व महिला मोठ्या आनंदाने सहभागी झाल्या  आणि मनमुराद आनंद लुटला.या यावेळी बोलताना पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी लोप पावत चाललेले पारंपारिक खेळ  जोपासले जावेत, नवीन पिढीला अवगत व्हावेत या मागचा उद्देश आहे अस सांगीतले. यावेळी परिसरातील  सहभागी झालेल्या महिलांनी समाधान व्यक्त करत पद्माराजे महीला संघटनेचे आभार मानले. या उपक्रमामध्ये संघटनेच्या पदाधिकारी, स...

विनिता भोगम यांच्या प्रचारात कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक...

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम  यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. यावेळी कळंबा गावासह कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थित होती. तर सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे कळंबा गावाला संलग्न असणाऱ्या कोल्हापूर शहराच्या उपनगरातील चार नगरसेवकांची  विनिता भोगम यांच्या प्रचारासाठीची उपस्थिती..कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मंदीराच्या प्रांगणात असंख्य कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या.विनिता भोगम यांनी श्री महालक्ष्मी  अंबाबाई देवीचे प्रथम दर्शन घेतले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यानंतर कळंबा गावात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी नगरसेवक अभिजीत खतकर, विजयसिंह खाडे,वैभव कुंभार,अभय तेंडुलकर,विलासराव बेडगे,रंगराव तोरस्कर या मान्यवरांनी प्रचाराला जमलेला जनसमुदाय विनिता भोगम यांचा विजय निश्चीत असल्याचे सांगुन जातोय अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. यावेळी कळंबा गावासह कळंबा मतदार संघातील म...

पाचगाव जिल्हा परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी संग्राम पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही...

Image
 पाचगाव ( प्रतिनिधी): पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम गोपाळ पाटील आणि उजळाईवाडी पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शिल्पा संदीप हजारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उजळाईवाडी येथील आसोबा मंदिरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी संग्राम पाटील यांनी पाचगावचे लोकनियुक्त सरपंचपद भूषवलेल आहे.त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असुन सरपंचपदाच्या काळात त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच पाचगावच्या जनतेने पुन्हा संग्राम पाटील यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांना सरपंच म्हणून निवडून दिले आहे.म्हणूनच पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संग्राम पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले.  यावेळी संग्राम पाटील यांनी  पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील जनतेने निवडुन दिल्यास, विकासाभिमुख काम करून मी जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविन असे अभिवचन दिल.यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने उप...

सौ.विनिता सागर भोगम यश मीळवणारच..भाजपा कार्यकर्त्यांना विश्वास..

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा गावचे पहीले लोकनियुक्त सरपंच सागर भोगम यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्य काळामध्ये केलेल्या अनेक  विकासकामांचा फायदा जिल्हा परिषद निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ.विनिता सागर भोगम यांना होणार आहे. कारण,सागर भोगम यांनी सरपंच असताना अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले होते. तसेच महिला बचत गटांना सक्षम बनवण्यासाठी अनेक रोजगार प्रशिक्षणे आयोजित केली होती. बचत गटांना चालना देण्यासाठी खाद्य महोत्सवही भरवले होते. तर कला, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात देखील मोलाचे योगदान दिले. क्रीडा क्षेत्राला उर्जित अवस्था आणण्यासाठी सागर भोगम यांनी अनेक स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.क्रिकेट,कुस्ती,बैलगाडी,बकर्‍याच्या टकरी अशा स्पर्धांना स्वखर्चातुन भरघोस बक्षीसे देवून क्रिडा क्षेञाला उर्जीत अवस्था आणली. तसेच गावातील रस्त्ये, लाईट, गटर्स अशा अनेक नागरी समस्या सोडवण्यात ते यशस्वी झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कळंबा ग्रामस्थांसाठी स्वप्नवत असणारी ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत नव्हती. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून सागर भोगम यांनी  कोट्यावधी रुपयांचा निधी ...

विनिता सागर भोगम यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये उत्साह..

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच सागर भोगम आणि त्यांच्या पत्नी विनिता भोगम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील  भाजपच्या कार्यकर्त्यांना दहा हत्तीचे बळ आले आहे. सागर भोगम यांची काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती, मात्र महायुती सरकारचे विकासाभिमुख कार्य पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भोगम दांपत्याने खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थीतीत  प्रवेश केला.सागर भोगम आणी विनिता भोगम  यांच्या भाजपप्रवेशाचे  कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात स्वागत होत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्याने विनिता भोगम यांची भाजपकडून कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे वनिता भोगम यांच्या रूपाने विरोधकांसमोर एक तगडे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सागर भोगम आणी विनिता भोगम यांनी आपला प्रचार सुरू केला असून वैयक्तिक गाठीभेटींच्यावर त्यांनी भर दिला आहे.

पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघात संग्राम पाटील यांना मोठा प्रतिसाद..

Image
 पाचगाव (प्रतिनिधी): पाचगावचे पहिले लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील  हे पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काँग्रेसकडून हात या चिन्हावर निवडणुक लढवत आहेत. संग्राम पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात विकासाभिमुख कार्य केले याची पोचपावती म्हणून त्यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांना देखील पाचगावच्या ग्रामस्थांनी पुन्हा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडुण दिले.पाटील दांपत्याचे विकासाभीमुख व पारदर्शी कामाची दखल घेत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संग्राम पाटील यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. संग्राम पाटील यांनी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आपला प्रचार सुरू केला असून त्यांना प्रचारामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सैन्यदलात निवड झालेल्या कोल्हापूरच्या जवानांचा नागरी सत्कार...

Image
 कागल (प्रतिनिधी): भुदरगड तालुक्यातील हेळेवाडी येथील संकेत फराक्टे तसेच कागल तालुक्यातील मांगनूर येथील प्रथमेश सुतार याची भारतीय सैन्यदलात तर सारीका फराक्टे  हीची सीआयएसएफ मध्ये निवड झाल्याबद्दल मांगनूर गावातील क्रांती कला क्रिडा व सांस्कृतीक मंडळाच्या वतीने तसेच महीलांच्या मार्फत नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक मान्यवरांनी सारीका फराक्टे,संकेत फराक्टे, प्रथमेश सुतार यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ग्रामस्थ,क्रांती तरुण मंडळाचे कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...

 कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिका निवडणुकीच्या संदर्भ देत कोल्हापूरातील शिवाजीपेठ परीसरात एका खळबळजनक पञकाच्या प्रति घरोघरी वितरीत करण्यात आल्या आहेत.त्या पञकात एका व्यक्तीच्या नावाचा संदर्भ देत त्या व्यक्तीने कोल्हापूरातील एका प्रसिध्द वकिलपुञाने  ऑफिसमध्ये एका तरुणीला बंदुकीचा धाक दाखवुन बलात्कार करुन फरार झालेल्या आरोपीला जरगवाडी येथील फार्महाऊसवर सर्व काही पुरवुन दडवुन ठेवले होते.एवढेच न्हवे तर त्यावेळी एका दैनिकामध्ये मालीका छापली होती .अशा आशयाचा खळबळजनक मजकुर वितरीत करण्यात आलेल्या हजारो पञकामधुन दिला गेल्यामुळे कोल्हापूरातील 'तो' प्रसिध्द वकील कोण? अशी चर्चा संपुर्ण शहरात रंगली आहे.

जेष्ठ पञकार मालोजी केरकर यांचे निधन...

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील ज्येष्ठ पत्रकार व सप्तगंगा टाईमचे संपादक श्री मालोजी केरकर (अण्णा) यांचे र्‍हदय विकाराच्या तिव्र धक्याने दुःख निधन झाले.गेली अनेक वर्षे ते पञकारीता क्षेञात कार्यरत होते.ते उत्तम फोटोग्राफर देखील होते.मुक्त पञकार म्हणून देखील त्यांनी अनेक दैनिकांसाठी काम केले होते.मनमीळावु स्वभावाच्या मालोजी केरकर यांचा संक्राती दिवशी झालेल्या अचानक निधनांने अनेकांना धक्का बसला आहे.

पद्माराजे महीला संघटनेच्यावतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी...

Image
 कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूरातील शिवाजी पेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे,सचिव आरती वाळके यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेच पूजन करण्यात आलं. यानंतर राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पद्माराजे महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा स्मिता हराळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सरीता सासने यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आलं. यावेळी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या गीता भोसले आणि अनिता पाटील यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याचा आढावा घेतला.कार्यक्रमाला आरती वाळके,संस्कृती  वरुटे, आशा पाटील, मेघा साळोखे, केतकी करंदीकर, पद्मा तुपारें  यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थिती होत्या.

मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूरात थाळीनाद...

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): सध्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे.या निवडणुकीमध्ये  नागरिकांना खोटी आश्वासन देऊन, आमिषे दाखवून चुकीच्या प्रवृत्ती निवडून येण्याची शक्यता आहे .त्यामुळे मतदारांनी व नागरिकांनी जागरूक होऊन शहराचा विकास करणाऱ्या व्यक्तीला तसेच योग्य उमेदवाराला निवडून द्यावे यासाठी कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील पद्माराजे महिला  संघटनेच्या वतीने जनजागृतीसाठी आगळावेगळा  उपक्रम घेण्यात आला. ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस पासून नागरीकांमध्ये जागृती करण्यासाठी सरकारने थाळी नाद केला होता त्याचप्रमाणे निवडणुकीत दाखवल्या जाणारी आमिषे म्हणजे एक प्रकारचा व्हायरसच आहे. त्यापासून लोकांनी सावध राहावं. यासाठी जनजागृती करण्यासाठी पद्माराजे महीला संघटनेच्यावतीने थाळीनाद करुन नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.शिवाजीपेठ येथील उभा मारुती चौक आणी अर्धा शिवाजी महाराज पुतळा  अशा दोन ठिकाणी संघटनेच्या महीलांनी  थाळीनाद  करून नागरीकांचे लक्ष वेधले.यावेळी 'दारुची बाटली,मटणाची नळी...पडू नका अमीषांना बळी' तसेच हजाराचे पाकीट घेवुन बसा,पुढची पाच वर्षे बोंबलत...

आजच्या साविञींचा कोल्हापूरात सन्मान...

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या  वतीने यावर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. पद्माराजे महिला संघटनेच्या  सामाजिक कार्यात सहभाग घेवुन आपले घर संसार सांभाळून सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या असलेल्या संघटनेच्याच सहा सदस्यांचा मेजर रुपा शहा यांच्या हस्ते  'आजची सावित्री' हा पुरस्कार देऊन  सन्मान करण्यात आला. यावेळी आरती वाळके,सुषमा सावंत,संस्कृती वरुटे,शालीनी चव्हाण,ज्योती काशीद,स्मीता हराळे यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले.यावेळी बोलताना पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरीता सासने यांनी संघटनेतील महीलांना सामाजीक कार्यात आणखीन प्रोत्साहन मीळावे व इतर महीलांनी या पुरस्कार विजेत्या महीलांपासुन प्रेरणा घ्यावी म्हणूनच हा उपक्रम राबवल्याचे सांगीतले. तर  मेजर रुपा शहा यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे सांगीतले.यावेळी हेमललता देसाई,आरती वाळके,सुषमा सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी  साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन जेष...