पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघात संग्राम पाटील यांना मोठा प्रतिसाद..


 पाचगाव (प्रतिनिधी): पाचगावचे पहिले लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील  हे पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काँग्रेसकडून हात या चिन्हावर निवडणुक लढवत आहेत. संग्राम पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात विकासाभिमुख कार्य केले याची पोचपावती म्हणून त्यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांना देखील पाचगावच्या ग्रामस्थांनी पुन्हा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडुण दिले.पाटील दांपत्याचे विकासाभीमुख व पारदर्शी कामाची दखल घेत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संग्राम पाटील यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. संग्राम पाटील यांनी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आपला प्रचार सुरू केला असून त्यांना प्रचारामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...