Posts

Showing posts from October, 2024

भाजपच्या महीला जिल्हा उपाध्यक्षपदी सरीता चौगले यांची निवड...

Image
  कळंबा (प्रतिनिधी)  : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा  उपाध्यक्षपदी कळंबा येथील सरिता सागर चौगले यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम यांनी केली आहे. या निवडीबद्दल शौमिका महाडिक यांचं सहकार्य लाभलं. आज भाजपच्या महीला मेळाव्यात समारंभ पूर्वक सरिता चौगले यांना भाजपच्या नेत्या तसेच भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आलं. यावेळी अरुंधती महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी महिला आघाडीने काम करावं असं आव्हान केलं. तर जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांनी सरिता चौगले यांचं महिला संघटन आणि आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे सांगीतले. तसेच भाजपची महिला आघाडी जिल्ह्यामध्ये सक्षमपणे शासकीय  योजना घरोघरी पोहोचवण्यात यशस्वी होत आहे असं नमुद केलं. तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष या पदाची दिलेली जबाबदारी आपण सक्षमपणे पार पाडू असा विश्वास सरिता चौगले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी रश्मी लाड, श...