Posts

Showing posts from July, 2023

"त्या" दिलेल्या परवानग्या रद्द करा...कळंबा वाचवा...

Image
 "त्या" परवानग्या रद्द करा,कळंबा तलाव वाचवा... (कोल्हापूर ब्रेकींग स्पेशल रपोर्ट ) कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. अशी परिस्थिती असताना देखील कळंबा,पाचगावसह कोल्हापूरातील काही भागांना पाणी पुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने अजुनही भरलेला नाही. कारण गेल्या दिवसांमध्ये कळंबा तलाव पाणलोट क्षेञात अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामे झाली आहेत .काही महाभागांनी प्लॉटींग करताना कळंबा तलावाला मिळणारे जलस्तोत्रांचे मार्ग बदलले आहेत, तर कळंबा तलावाला ज्या ओढ्या नाल्यातून पाणी येते त्या नैसर्गीक ओढ्या नाल्यांची पात्रच प्लॉटींगच्या नादात अरुंद किंवा बुजवण्याचे काम या महाभागांनी केले आहे. यामुळे कळंबा तलावातील जलस्तोत्र कमी झाले आहेत. यामुळे कळंबा तलाव निम्मा पावसाळा झालातरी अजूनही भरलेला नाही.या परस्थीतीला जबाबदार घटकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी कळंब्यातील नागरिकातून होत आहे. तसेच प्लॉटींग केल्यानंतर जलस्तोत्र नाहीशी झाली आहेत तर त्याच ठिकाणी बांधकाम झाल्यानंतर काय परिस्थिती होईल याचा विचार ही प्रशासनाने करावा व कळंबा पाणलोट क...

जुन्या कोल्हापूरचा दागीणा...

Image
कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील कै. बाबुराव सासने हे "गॅस बत्तीवाले बाबुराव" म्हणूनच प्रसिद्ध होते.खरोखरच महाद्वार रोडवरचे ते  एक अनोखे व्यक्तिमत्व होते. उंचेपुरे व्यक्तिमत्व,रंग गोरा, ओठावर रुळणा-या भारदस्त मिशा,कडक भाषा ,भेदक नजर- समोरच्या व्यक्तीचा ठाव घेणारी.! कोल्हापूरांतील केशवराव भोसले मधील त्यावेळची नाटके,लग्नाच्या वराती,दसरा गणपतीच्या मिरवणूका,संगीत मेळे, मोहरमच्या मिरवणूका,पंजा भेटी इत्यादी असंख्य प्रसंगासाठी लागणा-या गॅसबत्त्याना, फक्त कै. बाबुराव सासने यांच्या महाद्वार रोडवरील दुकाना शिवाय पर्यायच नव्हता.वीस- वीस गॅसबत्त्या सायकला अडकून त्या गॅसबत्त्या जागेवर स्वतः पोहोचवतांना बाबुरावना कोल्हापूरकर रोज पहात असत.गँसबत्त्या डोक्यावर धरुन मिरवणूकीच्या,वरातीच्या दोन्ही बाजूने चालणारे काळे सावळे स्त्री-पुरुष व गॅसबत्तीच्या प्रकाशात उजळून निघणारी वरात,मिरवणूकीचे दृष्यं अजूनही डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहते. कोल्हापूरांत कोठेच लाईट नसण्याच्या त्या काळात १२५ वर्ष्यापूर्वीचे महाद्वार रोडवरचे ते दुकान कोल्हापूरच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.अजूनही ते छोटसे दुकान १२५ वर्षापूर...

कोल्हापूरात शिवसेना ठाकरे गटाची मोर्चे बांधनी सुरु...

Image
 शिवसेनेत उभी फूट पडल्याने आता शिवसेना ठाकरे गटाने पक्ष बांधणी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशा नुसार कोल्हापूर जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हा समन्वयक म्हणुन दत्ताञय पाटील,कोल्हापूर दक्षिण उपतालुका प्रमुखपदी सागर पंतोजी,आरोग्य संघटकपदी कृष्णात म्हाकवे यांची निवड करण्यात आली आहे.नुतन पदाधिकार्‍यांना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते नियुक्ती पञक देण्यात आलीत.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, अवधूत साळोखे पोपट दांगट, तालुका प्रमुख विनोद खोत, विराज पाटील, राजू यादव, शांताराम पाटील, वाहतुक सेना तालुका प्रमुख दयानंद शिंदे, रवी जाधव, दिलीप पाटील, रमेश पाटील, मारुती संकपाळ, प्रशांत पाटील, संजय पाटील उपस्थीत होते.निवडी नंतर बोलताना नुतन जिल्हा समन्वयक दत्ताञय पाटील यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंञी पदाच्या काळात राबवलेल्या विविध योजनांची माहिती जनते पर्यंत पोहचवणार असुन पक्ष बांधनीसाठी गावागावात मेळावे घेणार असल्याचे सांगीतले.

सप्तश्रृंगी घाटात एसटी बसच्या अपघातात 18 प्रवाशी जखमी...

Image
सप्तश्रृंगी घाटात एसटी बसच्या अपघातात 18 प्रवाशी जखमी जखमींवर तातडीने उपचाराच्या पालकमंत्र्यांच्या सुचना नाशिक, दि. 12- सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघात झाला असून या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांचेवर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.  अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची मुक्कामी बस असून त्यात 18 प्रवासी प्रवास करीत होते. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून पालकमंत्री श्री. भुसे हे स्वतः आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहे.

अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदोलन...

Image
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये काही ट्रॅफिक पोलिसांची दादागिरी वाढत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे.  अनेक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड नसतात त्या ठिकाणी गाडी पार्क केल्यास ट्राफिक पोलीस आरेरावी करून वाहनधारकांच्या गाड्या उचलत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वनवे असल्याचं बोर्डच लावलेलेच नाहीत. कींवा लावलेले बोर्ड गायब झाले आहेत, त्यामुळे अनेक नागरिकांच्या वनवे असल्याचं लक्षात येत नाही. त्यामुळे अजाणतेमुळे वनवेतुन गेल्यावर वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरांमध्ये येणाऱ्या बाहेरील पर्यटकांच्या गाड्या आडवुन काही ट्रॅफिक पोलीस दादागिरी करत आहेत. असे सर्रास प्रकार पाहावयास मिळत असल्यामुळे कोल्हापूरचे नाव आता बाहेरील पर्यटकात खराब होत आहे.तर अनेकदा वादाच्या प्रसंगावेळी संबंधीत महीलांचे मोबाईलवर चिञीकरण करण्याचा अधिकार ट्रफीक पोलीसांना कोणी दिला. त्यामुळे अशा ट्रॅफिक पोलिसांना आपण योग्य ती समझ व सूचना द्याव्यात. तसंच काही ट्रॅफिक पोलीसच वनवेतून गाड्या घालतात, तर काहीजण नो पार्किंग मध्ये गाड्या लावतात.  अनेकवेळा ट्रफीक पोलीसच गाडी चालवत असताना मोबाईलवर...

कोल्हापूरात घेण्यात आली शपथ...

Image
  कोल्हापुरात काही दिवसापूर्वी जातीय दंगल झाली होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वकील आणि जिल्हा ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रताप जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेवाडी येथील विद्या संस्कार सेमी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी सर्वधर्मसमभाव आणि  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, मौलाना अब्दुल कलाम आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराराणी, वल्लभभाई पटेल अशा थोर समाजसुधारकांची वेशभूषा केली होती. अॅड. प्रताप जाधव हे आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात.  त्याचाच भाग म्हणून आज विद्यार्थ्यांनी एकात्मतेची शपथ घेतली.तर एडवोकेट प्रताप जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्य  मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या परीसरात वृक्षारोपण,कसबा बावडा येथील मतिमंद मुलांची शाळा येथे अल्पोउपहार व धान्य वाटप, अवनी...

वाढदिवसानिमीत्य अभिनव उपक्रम...

Image
 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठवले गटाचे युवक अघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे यांच्या  वाढदिवसानिमित्त RPI केर्ली शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 104 रक्तदात्यांनी आपले  रक्तदाण  केले.रक्तदाण केलेल्या रक्तदात्यांना सुभाष कांबळे यांच्या  वतीने हेल्मेट व प्रवासी बॅग देण्यात आल्या.या बॅग आणी हेल्मेटचे वितरण  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूरचे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे,कामगार आघाडी प्रदेश सचिव गुणवंत नागटिळे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे, माजी सरपंच विश्वनाथ पोवार यांच्या हस्ते रक्तदात्यांना करण्यात आले. यावेळी भिमराव कांबळे, जालिंदर कांबळे, नितीन शिंगाडे, कुमार कांबळे, पवण कांबळे, अमोल कांबळे, अर्जुन कांबळे, किरण भोसले, दीपक कांबळे, ब्रमानंद भोसले, दादु पुढारी, लखन कांबळे, पंकज कांबळे, राकेश कांबळे , संग्राम कांबळे, जिवण कांबळे ,विशाल मिरजकर ,सर्जेराव कांबळे, प्रदीप मिरजकर, शाखा अध्यक्ष सतिश कांबळे, आर पी आयचे व केर्ली येथील संयुक्त आंबेडकर नगरचे सर्व  प्रमुख...

कोल्हापूरात शालेय साहीत्याचे वाटप...

Image
 कोल्हापुरातील  पद्माराजे फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात येतात.याचाच एक भाग म्हणुन शिवाजी पेठ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी  तुळशीच्या रोपांचे देखील वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.यावेळी बोलताना फौंऊंडेशनच्या अध्यक्षा सरीता सासने यांनी फौंऊंडेशनच्या वतीने राबवल्या जाणार्‍या उपक्रमाची माहीती उपस्थीतांना  दिली.तर शाळेत अव्वल येणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहीत्य देणार असल्याचही सासने यांनी सांगीतले.यावेळी शाळेतील शिक्षक,विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.तर विद्यार्थ्यांना बिस्कीटचे पुडे ही फौंडेशनच्या वतीने देण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना चौगुले, उपाध्यक्ष अर्पिता पावले, पद्माराजे फौंऊंडेशनच्या सचिव आरती वाळके,अनिता पाटील, सावित्रीबाई फुले विद्यालयातील शिक्षक अशोक जोग, अजित कानकेकर, संदीप पाटील, शंकर साळुंखे...

कोल्हापूरात संतापाची सही...

Image
 महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशा चोता झाला आहे .यामुळे महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा खराब झाली आहे. आप आपल्या युत्या आणि आघाड्या तोडून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्ता स्थापन करुन महाराष्र्टातील मतदारांचा अपमान केला आहे, यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचा निषेध जनतेने नोंदवावा यासाठी मनसेनं एक सही संतापाची हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती मनसेचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिली. गेल्या दोन दिवसापासून हा उपक्रम कोल्हापूर शहरांमध्ये राबवण्यात आला.यावेळी अनेक नागरीकांनी सह्या करत सरकारचा निषेध केला. या उपक्रमात मनसेचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.