जुन्या कोल्हापूरचा दागीणा...

कोल्हापूरातील शिवाजीपेठ येथील कै. बाबुराव सासने हे "गॅस बत्तीवाले बाबुराव" म्हणूनच प्रसिद्ध होते.खरोखरच महाद्वार रोडवरचे ते  एक अनोखे व्यक्तिमत्व होते. उंचेपुरे व्यक्तिमत्व,रंग गोरा, ओठावर रुळणा-या भारदस्त मिशा,कडक भाषा ,भेदक नजर- समोरच्या व्यक्तीचा ठाव घेणारी.!
कोल्हापूरांतील केशवराव भोसले मधील त्यावेळची नाटके,लग्नाच्या वराती,दसरा गणपतीच्या मिरवणूका,संगीत मेळे, मोहरमच्या मिरवणूका,पंजा भेटी इत्यादी असंख्य प्रसंगासाठी लागणा-या गॅसबत्त्याना, फक्त कै. बाबुराव सासने यांच्या महाद्वार रोडवरील दुकाना शिवाय पर्यायच नव्हता.वीस- वीस गॅसबत्त्या सायकला अडकून त्या गॅसबत्त्या जागेवर स्वतः पोहोचवतांना बाबुरावना कोल्हापूरकर रोज पहात असत.गँसबत्त्या डोक्यावर धरुन मिरवणूकीच्या,वरातीच्या दोन्ही बाजूने चालणारे काळे सावळे स्त्री-पुरुष व गॅसबत्तीच्या प्रकाशात उजळून निघणारी वरात,मिरवणूकीचे दृष्यं अजूनही डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहते.
कोल्हापूरांत कोठेच लाईट नसण्याच्या त्या काळात १२५ वर्ष्यापूर्वीचे महाद्वार रोडवरचे ते दुकान कोल्हापूरच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.अजूनही ते छोटसे दुकान १२५ वर्षापूर्वी जसे होते, तसेच आजही उभे आहे.याचे सर्व श्रेय बाबुराव यांचे "पितृभक्त" पुत्र श्री बाळासाहेब सासने यांना जाते.आसपासच्या सर्व मराठी दुकान मालकांनी आप आपली दुकाने येईल त्या किमतीस विकून टाकली ,पण बाळासाहेबांनी आपले दुकान लाखो रुपयांची मागणी असुनही विकले नाही. आज ही ते रोजच्या रोज दुकान उघडून बसतात.पूजा करतात.बाबांच्या "बैठकीस "
नमस्कार करुन दिवसभर थांबतात.
कोल्हापूरातील नाटक, संगीत मेळे, लग्नांची वरात, राजकीय व सांस्कृतिक मिरवणुका,अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला बाबुरावांच्या गॅसबत्त्यांनी ,जेव्हा कोल्हापूरात लाइट आली नव्हती त्यावेळी सर्व परिसर उजळून काढण्याचे काम इमाने इत्तबारे केले. 
आजही त्या भारदस्त व्यक्तीमत्वाची आठवण कोल्हापुरातील जुनी जाणती मंडळी काढतात.
बाळासाहेबानी आपल्या वडिलांची स्मृती दुकानाच्या रुपाने जतन करून ठेवली आहे.  उनीपुरी उंची, गोरा रंग, ओठावर आलेल्या भारदस्त मिशा असलेला फोटो ते आजही अभिमानाने दाखवत असतात.  महाद्वार रोडवरचे हे छोटेसे दुकान, आजही त्यांच्या कामावरील प्रचंड श्रद्धा नियमितता ,करारीपणाची साक्ष देत उभे आहे.
आजुबाजूची सर्व दुकाने विकली गेली असतांना बाळासाहेबांनी  दुकानासाठी लाखोंची ऑफर आली असतानाही,  जुन्या गॅसबत्त्या, हत्यारे, जुने कपाट, फोटो,जर्मन मेड दुरूस्तीची हत्यारे, दुकानाचा मेटलचा जर्मन मेड
शिक्का,नाटकातील नट मंडळींचे फोटो असलेले स्मृतिग्रंथ व  अनेक कागदपत्रे,  आपल्या वडिलांची स्मृती म्हणून जतन करुन ठेवलेली आहेत. खंडेनवमीला हत्यारे पूजन,दिवाळीचे वही पूजन ,रोजचे फोटो पूजन नित्यनियमाने करीत असतात.रोज दुकान नियमितपणे उघडतात.स्वच्छ करतात व  दिवसभर थांबतात. दुकानाला भेट देणा-यां प्रत्येकाला  आपल्या वडिलांच्या बद्दल अभिमानाने भरभरून बोलतात. खरच हॅट्स अॅाफ टू बोथ!  दोघां पुञांबद्दलही 
कोल्हापूरकरानां नक्कीच अभिमान वाटावा असच आहे.तर आताचे सासनेंचे दुकान म्हणजे  जुन्या कोल्हापूरचा आठवणीचा दागीणाच म्हणावा लागेल...

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...