Posts

Showing posts from December, 2025

'राजर्षी' दिनदर्शिकेच्या माध्यमातुन सामाजीक बांधीलकीचा विचार आणी प्रसार..

Image
 शाहू विचारांच्या प्रसारासाठी झटणाऱ्या शाहू छत्रपती फौंडेशनच्या पाठीशी छत्रपती परिवार श्रीमंत मालोजीराजे छत्रपतींची ग्वाही ...नवीन राजवाडा परिसरात ' राजर्षी ' दिन दर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न... कोल्हापूर (प्रतिनिधी): चौदा वर्षे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार शाहू छत्रपती फौंडेशन तळमळीने करत आहे. या संस्थेच्या पाठीशी कोल्हापूरचा छत्रपती परिवार नेहमीच राहील, अशी ग्वाही श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी आज येथे बोलताना दिली.राजर्षी शाहू महाराजांच्या पद स्पर्शाने पुणीत झालेल्या नवीन राजवाडा परिसरात शाहू छत्रपती फौंडेशनच्या राजर्षी या दिन दर्शीकेचे प्रकाशन मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करणारी राजर्षी ही जगातील एकमेव दिनदर्शिका आहे. 2026 सालच्या या दिन दर्शीकेचे प्रकाशन आज झाले.यावेळी बोलताना शाहू छत्रपती फौंडेशनचे संस्थापक सचिव जावेद मुल्ला, आणि संचालक पत्रकार नवाब शेख यांनी संस्थेच्या गेल्या चौदा वर्षातील कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या भविष्यातील ' शाहू शिधा या उपक्रम...

विविध उपक्रमांनी केंद्रीय मंञी रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा..

Image
 कागलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा. कागल (प्रतिनिधी): रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कागल येथे सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे तसेच कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.वाढदिवसानिमित्त स्व. गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय, स्व. राजे कर्नल दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर व मुकबधीर विद्यालय येथील विद्यार्थ्यांना आणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. स्व. राजे कर्नल दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर व मुकबधीर विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनही आयोजित करण्यात आले होते.यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, चंद्रशेखर कोरे,  बी. आर. कांबळे, सात्तापा आणुरकर, विशाल चिखलीकर यांनी मनोगते व्यक्त करत केंद्रीय मंञी रामदास आठवले यांचे सामाजिक न्यायासाठीचे योगदान अधोरेखित केले.कार्यक्रमाला  अविनाश शिंदे,संजय लोखंडे, सचिन मोहिते...

केलेल्या विकास कामांच्या जोरावरच निवडणुकीच्या रिंगणात- दुर्वास(बापू) कदम

Image
 केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता पुन्हा संधी देईल- दुर्वास (बापू) कदम कोल्हापूर (सागर चौगले): कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजीक,राजकीय,शैक्षणीक,क्रिडा क्षेञात गेल्या 32 वर्षाहून अधिक काळ अखंडीतपणे कार्यरत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे दुर्वास बापू कदम...सामाजीक प्रश्नांवर,महीलांवर होणार्‍या अन्याय अत्याचारा विरोधात,प्रशासकीय प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी अनेक आंदोलन,मोर्चे काढून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दूर्वास कदम कायमच प्रयत्नशील राहीलेत.राहूल गांधी यांची भारत जोडो याञेत सहभाग असो,मराठा आरक्षणाचे आंदोलन असो कींवा धनगर समाजाच्या मागण्यांसाठीचे आदोलन असो दुर्वास कदम यांचा सहभाग नेहमीच अग्रभागी राहीला आहे. रस्त्यावरील लढाई लढत असतानाच,  शहराच्या विकासाबरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न महापालिकेच्या सभागृहात मांडून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्धार दुर्वास कदम यांनी केला. मात्र त्यांना सुरुवातीच्या काळात अपयश आलं १९९५ त्यानंतर २०००,२००५ आणि २०१० अशा सल्लग चार निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र २०१५ साली  त्यांच्या पत्नी वृषाली कदम यांनी आमदार...

हेमंत पाटील यांना प्रभाग क्रमांक आठरामधील नागरीकांचा वाढता पाठींबा...

Image
 कोल्हापूर (सागर चौगले) : गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ समाजकार्य आणि राजकारणामध्ये सक्रिय असणारे हेमंत(बापू) पाटील हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यानंतर राजकीय परिस्थिती काळानुसार बदलत गेली आणि हेमंत पाटील यांनी २०१४ साली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सध्या हेमंत पाटील यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्राम विकास विभागाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ते पश्चिम महाराष्ट्र विभागीय सहसंयोजक देखील आहेत.  हेमंत पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणाबरोबरच समाजकार्याचा देखील वसा जोपासला आहे. कोरोना सारख्या महाभयंकर काळात नागरिकांना केलेली मदत असो कींवा रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीरे आयोजित करून नागरिकांची केलेली सेवा असो हेमंत पाटील निस्वार्थपणे समाज कार्यात अग्रेसर राहीले आहेत.मराठा आरक्षण आणी कोल्हापूरातील टोल विरोधी आंदोलनात हेमंत पाटील कायमच अग्रभागी राहीलेत. त्याचबरोबर पश्चिम महारा...

महायुती म्हणून एकञ निवडणुक लढण्याचा निर्णय-आमदार राजेश क्षिरसागर यांची माहीती...

Image
 महायुती म्हणून एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत; तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी: महायुतीच्या बैठकीत निर्णय कोल्हापूर दि.१९ : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक  संपन्न झाली. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक,जयंत पाटील उपस्थित होते. बैठकीत तिन्ही पक्षांची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या वतीने युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपच्या वतीने आमदार अमल महाडिक, प्रा.जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदील फरास, महेश सांवत, संदीप कवाळे प्रमुख असणार आहेत. या उपसमितीची उद्या बैठक पार पडणार आहे. ही उपसमिती प्रत्येक प्रभागात...

के.एम.टी रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम: आमदार राजेश क्षिरसागर

Image
  कोल्हापूर दि.१५ : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील रिक्त असणाऱ्या चालक- वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीवरील जेष्ठ व विनियमातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. आज नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. गेले ३० ते ३५ वर्षे रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या यशस्वी पाठ पुराव्यामुळेच महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील ५०८ रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले होते. यावेळी काही तांत्रिक त्रुटीमुळे के.एम.टी.तील १५६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता.  याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आणि के.एम.टी.चे रोजंदारी कर्मचारी कायम करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री ए...

कोल्हापूरात आय टी पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा-आमदार राजेश क्षिरसागर

Image
 नागपूर दि.१३ : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच. त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे. कोल्हापुरात आय.टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंञ्यांच्याकडे प्रलंबित होते. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी गत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधिमंडळाचे लक्ष वेधले होते. सदर प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सभागृहास आश्वासित केले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यास यश आले असून, आय.टी.पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी ...