केलेल्या विकास कामांच्या जोरावरच निवडणुकीच्या रिंगणात- दुर्वास(बापू) कदम


 केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता पुन्हा संधी देईल- दुर्वास (बापू) कदम


कोल्हापूर (सागर चौगले): कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजीक,राजकीय,शैक्षणीक,क्रिडा क्षेञात गेल्या 32 वर्षाहून अधिक काळ अखंडीतपणे कार्यरत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे दुर्वास बापू कदम...सामाजीक प्रश्नांवर,महीलांवर होणार्‍या अन्याय अत्याचारा विरोधात,प्रशासकीय प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी अनेक आंदोलन,मोर्चे काढून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दूर्वास कदम कायमच प्रयत्नशील राहीलेत.राहूल गांधी यांची भारत जोडो याञेत सहभाग असो,मराठा आरक्षणाचे आंदोलन असो कींवा धनगर समाजाच्या मागण्यांसाठीचे आदोलन असो दुर्वास कदम यांचा सहभाग नेहमीच अग्रभागी राहीला आहे. रस्त्यावरील लढाई लढत असतानाच,  शहराच्या विकासाबरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न महापालिकेच्या सभागृहात मांडून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्धार दुर्वास कदम यांनी केला. मात्र त्यांना सुरुवातीच्या काळात अपयश आलं १९९५ त्यानंतर २०००,२००५ आणि २०१० अशा सल्लग चार निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र २०१५ साली  त्यांच्या पत्नी वृषाली कदम यांनी आमदार सतेज पाटील आणी ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ६८ मधून कळंबा फिल्टर हाऊस मधून निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाल्या.आणी इथून पुढे सुरु झाल नवं विकास पर्व... प्रभाग क्रमांक ६८ कळंबा फिल्टर हाऊस हे कोल्हापूर शहराचे दुर्लक्षित उपनगर होतं. या ठिकाणी अनेक ओपन पीस होते, मात्र त्या ओपन पेसचा अक्षरशा कोंडावळा झाला होता. त्याचबरोबर मैल खड्याची प्रशस्त जागा होती. मात्र हा परिसर मिनी झूम प्रकल्प म्हणावा की काय असा अस्वच्छ झाला होता, कचऱ्याचे ढिगारे ,दुर्गंधीने व्यापलेला होता. प्रभागात शोधूनही सापडणार नाही अशी ड्रेनेजची अवस्था होती.पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, तर रस्त्यांचा पत्ताच नव्हता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या प्रभागाचा विकास करण्याचे आव्हान  दुर्वास कदम यांच्या नेतृत्वाखाली वृषाली कदम यांनी स्वीकारल.आणी  मिळालेल्या संधीचं सोनं करत कोल्हापूर शहराचा एक स्मार्ट प्रभाग बनवायचा या उद्देशाने  कदम दांपत्य कामाला लागले.

 महापालिकेच्या सभागृहात प्रभागातील प्रश्न मांडायला वृषाली कदम यांनी सुरुवात केली जे कोंडाळाग्रस्त ओपन पेस होतेत त्या ठिकाणी बगीचे झालेत तर काही ठिकाणी महिलांसाठी विरंगुळा केंद्रं झालीत. ज्या मैल खड्याची मिनी झुम प्रकल्पासाठी अवस्था झाली होती तो स्वच्छ करण्यात आला.त्या ठिकाणी नागरिक फिरायला येऊन तिथं मोकळा श्वास घेऊ लागले.२५ वर्ष भेडसावणारा ड्रेनेजचा प्रश्न निकालात काढण्यात आला, प्रभागात चकचकीत रस्त्ये करण्यात आलेत, बेंगलोरच्या धरतीवर कोल्हापूरमध्ये प्रथमच ई टॉयलेट संकल्पना राबवण्यात आली. प्रभागांमध्ये अखंडित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.निर्माण चौक परीसरातील ताराराणी काॅलनी मधील तब्बल ११० घराचं प्रॉपर्टी कार्ड बनवून नागरीकांना देण्यात आलीत,आणी पन्नास वर्ष प्रलंबीत असणारा प्रश्न निकालात काढण्यात आला. आमदार सतेज पाटील आणी ऋतुराज पाटील यांच्या विकास निधीतुन तब्बल आठ कोटी रुपयांची अनेक विकास कामे करून दुर्वास कदम आणि त्यांच्या पत्नी वृषाली कदम यांनी प्रभागातील नागरिकांची मन जिंकलीत. प्रभागातील विकास कामे करत असतानाच वृषाली कदम यांना महिला व बालकल्याण सभापतीपद भूषवण्याची संधी मिळाली. यादेखील संधीच सोनं करत वृषाली कदम यांनी बंद पडण्याच्या मार्गावर असणार्‍या साविञीबाई फुले रुग्णालयाला जीवदान देण्याचे काम केलं. या रुग्णालयाला अनेक ठिकाणी गळती लागली होती, डिलिव्हरी  विभागाची तर अक्षरशः दुर्दशा झाली होती.अशीच काहीशी अवस्था पंचगंगा रुग्णालयाची झाली होती.या दोन्ही रुग्णालयाला विकास निधी देवून ही रुग्णालये अद्यावत व सुसज्ज करण्यात आलीत. या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी वॉटर फील्टर बसवण्यात आलेत. तसेच शहरांमधील बावीस शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रत्येक शाळेत वॉटर फील्टर बसवण्यात आलेत. वृषाली कदम यांनी दुर्वास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा विकास केलाच शिवाय महिला व बालकल्याण सभापतीपद भूषवत कोल्हापूर शहराच्या  विकासामध्ये देखील खारीचा वाटा उचलला.प्रभाग क्रमांक ६८ कळंबा फील्टर हाऊस या प्रभागात विकास म्हणजे काय हे पहाण्यासाठी म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, नंदनवन कॉलनी,  नारायणराव सासने नगर ,  ताराराणी कॅलनी,निर्माण तरुण मंडळ, मैलखड्डा झोपडपट्टी, शिंदे अंगण, गुरु महाराज नगरी, शाहू हौसिंग सोसायटी, पाडळकर वसाहत, यशवंत कमळ काॅलनी या परीसरात फेरफटका मारल्यानंतर लक्षात येईल आणी म्हणूनच केलेल्या विकास कामांच्या जोरावर नवी दिल्ली येथे डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशीप पुरस्काराने सन्मानीत झालेले  दुर्वास कदम काँग्रेस पक्षाकडून हात या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून या निवडणुकीत देखील दुर्वास बापू कदम यांना प्रभाग क्रमांक १९ मधून पुन्हा नागरिक संधी देतील यात शंका नाही.


कोल्हापूर ब्रेकिंग -संपर्क क्रमांक -9326499921/8483899521

Comments