Posts

Showing posts from January, 2024

कोल्हापूर युवासेना पदाधिकारी यांचा वीटभट्टी कामगारांच्या मुलां सोबत प्रजसत्ताक दिन साजरा...

Image
 कोल्हापूर युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) यांच्या वतीने 26 जानेवारी निमित्त वीटभट्टी कारागीरांच्या मुलांसोबत हा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी वीटभट्टी कामगारांच्या शेकडो मुलांना जिलेबी आणि मिठाई वाटण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन मंजीत माने, अक्षय घाटगे, रघु भावे, चैतन्य देशपांडे,  यांनी केले होते.यावेळी उपस्थित योगेंद्र माने, संतोष कांदेकर, अवदेश करंबे, अभि दाबडे, श्रीरांग वडर, सुनील कानूरकर, राजेश्री मिनचेकर, माधुरी जाधव, सानिका दामूगडे,संग्राम पाटील,प्रथमेश रांगणे आदी उपस्थीत होते.

परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील शिवसेनेत...

Image
 कोल्हापूर  : कोल्हापुरात  शिवसेनेच्या मुख्यमंञी एकनाथ शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरु झाले असून, परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर आणी जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण  यांच्या हस्ते भगवा झेंडा आणि भगवा स्कार्फ स्वीकारून संजय पाटील यांच्यासह शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.  संजय पाटील यांनी गेल्या बावीस वर्षात जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या, रेशनच्या प्रश्नांवर  शेकडो आंदोलने केली आहेत. भ्रष्टाचारा विरोधात लढाई लढताना त्यांनी आजपर्यंत १३ शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे. तसेच अनेक रेशन धान्य दुकानातील काळा बाझार उघडकीस आणला आहे. ऊस दर आंदोलनात पाटील हे अग्रेसर राहीले  आहेत. तर जिल्हा परिषद मधील मुदतबाह्य औषध घोटाळाही उघडकीस आणला आहे, तसेच रेशन वरील गहू घोटाळा उघडकीस आणला त्याचे पडसाद विधानसभेत उमटले  होते.संजय पाटील तीन कामगार संघ...
Image
निधन वार्ता  फोटो : मधुकर सखाराम गौड  कळंबा :  साळोखे गल्ली कळंबा येथील मधुकर सखाराम गौड (वय ६३ ) यांचे अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.    

आगळ्या वेगळ्या उपक्रमाने जिजाऊ जयंती साजरी...

Image
 कोल्हापूरात शिवाजीपेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लिलाबाई पोवार, शकुंतला सरनाईक, संयोगिता मोहिते यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी संघटनेच्या महिलांना स्टेज डेरींग व्हावे यासाठी प्रत्येक महिलेने स्टेज वर येवुन माईकवर आपली मनोगते व्यक्त केलीत,तर कोणी गाणी म्हटलीत तर कोणी उखाणे घेतलेत तसच काही महिलांनी राजमाता जिजाऊंवर भाषणे केलीत,तर काहीनी विनोदी कीस्से सांगीतले,कवीता म्हटल्या यावेळी सहभागी महीलांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी हिंद मर्दानी खेळाच्या आखाड्याच्या मुलांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. महिलांना व्यासपीठावर बोलण्याच धाडस व्हावे, तसेच आपले विचार मांडण्याची क्षमता महिलांमध्ये जागृत व्हावी असं कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा अध्यक्षा आरती वाळके,शहर अध्यक्षा सुषमा ...

राजमाता जिजाऊंची जयंती आदर्शवत उपक्रमाने साजरी...

Image
 कोल्हापूर : कोल्हापुरात राजमाता जिजाऊ जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. टिंबर मार्केट येथे राहणाऱ्या व निराधार असणार्‍या श्रीमती रेखा साळवी या पंच्याहत्तर वर्षाच्या वृध्द महिलेची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे, त्याचबरोबर त्यांच्या डोळ्याचेही मोतीबिंदुचे ऑपरेशन झाले आहे. यामुळे धुणी भांडी करुन कसाबसा आपला उदरनिर्वाह चालवणार्‍या श्रीमती रेखा साळवी यांना ऑपरेशन झाल्यामुळे कामावरही जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळणे मुश्किल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीच्या खर्चाला फाटा देवून श्रीमती साळवी यांना दोन महिन्याचा शिधा देण्यात आला.तसेच जीवनावश्यक वस्तू,साड्या देवुन आर्थिक मदतही करण्यात आली. हा आदर्शवत उपक्रम पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांच्या संकल्पनेतून पार पडला. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आरती वाळके,सरीता सासने, शहराध्यक्षा सुषमा सावंत, जिल्हा कार्याध्यक्षा स्मिता हराळे, जिल्हा उपाध्यक्षा शर्मिला भोसले, तृप्ती साळोखे, शशिकला गवळी, उषा महिंद्रेकर, अनिता पाटील, कल्पना म...