आगळ्या वेगळ्या उपक्रमाने जिजाऊ जयंती साजरी...


 कोल्हापूरात शिवाजीपेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लिलाबाई पोवार, शकुंतला सरनाईक, संयोगिता मोहिते यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी संघटनेच्या महिलांना स्टेज डेरींग व्हावे यासाठी प्रत्येक महिलेने स्टेज वर येवुन माईकवर आपली मनोगते व्यक्त केलीत,तर कोणी गाणी म्हटलीत तर कोणी उखाणे घेतलेत तसच काही महिलांनी राजमाता जिजाऊंवर भाषणे केलीत,तर काहीनी विनोदी कीस्से सांगीतले,कवीता म्हटल्या यावेळी सहभागी महीलांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी हिंद मर्दानी खेळाच्या आखाड्याच्या मुलांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. महिलांना व्यासपीठावर बोलण्याच धाडस व्हावे, तसेच आपले विचार मांडण्याची क्षमता महिलांमध्ये जागृत व्हावी असं कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा अध्यक्षा आरती वाळके,शहर अध्यक्षा सुषमा सावंत, शर्मिला भोसले, अलका कोळेकर, तृप्ती साळोखे, शशिकला गवळी, कल्पना मोरे , उषा महिंद्रकर , सुवर्णा भोसले, शिला सुतार, विद्या चौगले,जयश्री गवळी,साधना परब,विजयमाला गुरव यांच्यासह महीला उपस्थीत होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...