कळंबा तलाव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनीधींना साकडे...
कळंबा तलाव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनीधींना साकडे. कोल्हापूर : कळंबा आणि पाचगाव गावासह कोल्हापूर शहराला वरदान ठरलेला कळंबा तलावाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. कळंबा तलावाची निर्मिती करत असताना छत्रपती शाहू महाराजांनी कळंबा तलावाला मिळणारे जलस्तोत्र ,ओढे, नाले यांना धोका पोहोचू नये तसेच कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी या ठिकाणी असणारे बालिंगा गावाचं स्थलांतर केलं. हा राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि यामागचा मोठा विचार होता. मात्र या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीला आणि विचारांना हाडताळ फासण्याचे काम एक बिल्डर करत आहे. याच परिसरात एका बिल्डर नंदीनी जाधव नगराची निर्मीती करत असल्याचे दिसत आहे. यामुळे कळंबा तलावाच्याच पाणलोट क्षेञात वसणार्या या नगरामुळे ओढे, नाले तसेच कळंबा तलावाला मिळणारे जल स्तोत्र जवजवळ नष्ट झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात महीना महीनाभर वहाणारा कळंबा तलाव अवघ्या चारच दिवसात व्हायचा बंद झाला आहे. यावरून तलावाला मीळणारे जल स्तोत्र नष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहेत .यामुळे कळंबा तलावाचे अस्तीत्वच धोक्यात आले आहे...