कळंबा तलाव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनीधींना साकडे...

 

कळंबा तलाव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनीधींना साकडे.


कोल्हापूर : कळंबा आणि पाचगाव गावासह कोल्हापूर शहराला वरदान ठरलेला कळंबा तलावाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. कळंबा तलावाची निर्मिती करत असताना छत्रपती शाहू महाराजांनी कळंबा तलावाला मिळणारे जलस्तोत्र ,ओढे, नाले यांना धोका पोहोचू नये तसेच कळंबा तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी या ठिकाणी असणारे बालिंगा गावाचं स्थलांतर केलं. हा राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि  यामागचा मोठा विचार होता. मात्र या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीला आणि विचारांना हाडताळ फासण्याचे काम एक बिल्डर करत आहे. याच परिसरात एका बिल्डर नंदीनी जाधव नगराची निर्मीती करत असल्याचे दिसत आहे. यामुळे कळंबा तलावाच्याच पाणलोट क्षेञात वसणार्‍या  या नगरामुळे ओढे, नाले तसेच कळंबा तलावाला मिळणारे जल स्तोत्र जवजवळ नष्ट झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात महीना महीनाभर वहाणारा कळंबा  तलाव अवघ्या चारच दिवसात व्हायचा बंद झाला आहे. यावरून  तलावाला मीळणारे जल स्तोत्र नष्ट झाल्याचे  स्पष्ट होत आहेत .यामुळे कळंबा तलावाचे अस्तीत्वच धोक्यात आले आहे.कळंबा तलाव वाचवण्यासाठी आता काही संघटना एकत्र आल्या असुन  उद्यापासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील यांना भेटून या ठिकाणचे नगर वसवण्याचा जो बिल्डरचा प्रयत्न आहे ,तो त्वरित थांबवावा तसेच याठीकाणी प्राधिकरणाच्या ज्या अधिकार्‍यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता चिरीमीरीसाठी ले आऊटला मंजुरी दिलेली आहे त्यांना शासकीय सेवेतुन बडतर्फ कराव जेणेकरुन याठीकाणी पुन्हा ले आऊट मंजुरी देण्याचे धाडस इतर अधिकारी करणार नाहीत व कळंबा तलाव वाचवावा असे निवेदन देऊन साकडे घालणार आहेत

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...