Posts

Showing posts from November, 2025

कात्यायणी देवीचा भंडारा उत्सव उत्साहात संपन्न...

Image
 कळंबा ( प्रतिनिधी) : कोल्हापुरातील नवदुर्गापैकी एक असणाऱ्या कात्यायणी देवीचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भंडारा उत्सवानिमित्त कात्यायणी  देवीची त्रिपुरा सुंदरी स्वरूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.ही पुजा श्रीपुजक राजु गुरव,वैभव गुरव यांनी बांधली होती. यावेळी मंदीरात होम हवानासह विविध धार्मिक विधी पार पडले. तर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.तसेच सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तर राञी  फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. कात्यायणी देवस्थान समिती महाप्रसाद कमिटीचे अध्यक्ष अमर जत्राटे यांच्या नियोजनाखाली हा उत्सव पार पडला.  आमदार अमल महाडिक यांच्यासह मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.तर दिवसभरात पाच हजाराहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

श्रीमंती रामाणे यांचे निधन..

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील रायगड काॅलनी येथील श्रीमती श्रीमंती बापु रामाणे वय ९० वर्षे यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात मोठा परीवार आहे.पंचगंगा स्मशान भुमी येथे बुधवार दिनांक १९  नोव्हेंबर रोजी सकाळी ८:०० वाजता रक्षा विसर्जन आहे. 

सरपंचपदी मंडलीक गटाचे पाटील यांची बिनविरोध निवड...

Image
 कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द  गावच्या  सरपंचपदी शिवसेना मंडलिक गटाचे  महादजी अंकुश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अनिता पाटील होत्या.तर निवडणुक अधिकारी म्हणून ग्रामसेवीका राजश्री सुर्यवंशी आणी श्री कोरवी यांनी काम पाहीले.निवडी नंतर नुतन सरपंच महादजी पाटील यांनी बेलवळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. यावेळी माजी सरपंच छाया जाधव, शिवसेना कागल तालूका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील,धनाजी कांबळे,राजे गटाचे मारुती पाटील,के पी पाटील, महालक्ष्मी दुध संस्था चेअरमन  संभाजी पाटील,  हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक  नेताजी पाटील, विनायक वाईंगडे, उमाजी पाटील,मधूकर पाटील , तंटामुक्तीचे अध्यक्ष  ज्ञानदेव जाधव,अमर पाटील, मारुती जाधव यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य,कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थीत होते.

दिपोत्सवात आला साप...महिलांची उडाली तारांबळ...

Image
 कोल्हापूर ( प्रतिनाधी): त्रिपुरारी पौर्णीमेची संध्याकाळ होती!शिवाजीपेठेतील पद्माराजे महीला संघटनेच्या महीला कार्यकर्त्यांनी ऐतिहासीक रंकाळा तलावाच्या काटावर दिपोत्सवाचे आयोजन केले होते.उपस्थीत सर्व महीलांनी उत्साहात रंकाळाच्या काटावर दिप प्रज्वलीत करण्यास सुरवात केली.सर्व महीला पणत्या लावण्यात मग्न होत्या.तर त्यातील एक महीला याचा व्हीडीओ करत होती.पणत्या लावुन झाल्यावर फोटो शेषन चालु झाल..तोवर एक महीला म्हणाली "अग सापासारख काहीतरी दिसतय"...अस म्हणताच एकच गोंधळ उडाला..पहातो तर काय, तलावातील एक विरोळा ज्या ठीकाणी महीला पणत्या लावत होत्या त्याच ठीकाणी पाण्यातुन अचानक बाहेर आल्याने महीलांची अक्षरशा तारांबळ उडाली,साप आल्याच्या भितीने महीलांची चांगलीच भंबेरी उडाली.त्यातच अंधार पडला असल्यामुळे लावलेल्या पंत्यांच्या प्रकाशात लगबगीने आपआपल्या मोबाईलवर सेल्फी घेवुन महीलांनी घरचा रस्ता धरला..जाताना माञ  कायमचा दिपोत्सव लक्षात राहीला असे म्हणत महीला हसून लोटपोट झाल्या..

आगळा वेगळा विवाह समारंभ ठरला कौतुकाचा विषय...

Image
  कोल्हापूर ( प्रतिनिधी): इतिहासाचे स्मरण, हुतात्म्यांना वंदन, संविधानिक मूल्यांचे जतन, पर्यावरणाचे संवर्धन, आणि युवा पिढीशी संवाद साधत क्रांती प्रेरणा विवाह कोणत्याही धार्मिक विधी कर्मकांडांशिवाय संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांचे स्मृतिप्रित्यर्थ पलूस तालुक्यातील बलवडी येथे  ज्येष्ठ पर्यावरणवादी संपतराव पवार यांनी सन 1992- 93 साली शेकडो वृक्षांचे रोपण करून क्रांती स्मृतीवन उभारले आहे. शाहू चरित्र अभ्यासक कराड येथील एडवोकेट संभाजीराव मोहिते यांचे चिरंजीव लेफ्टनंट कमांडर हर्षवर्धन आणि सुनीलराव पाटील यांची कन्या प्रियांका यांचा विवाह भारतीय ध्वज, राज्यघटना, महापुरुषांच्या प्रतिमा, यांना वंदन करून वृक्षरोपण आणि क्रांती वनातील वृक्षांना खतपाणी देऊन विवाह संपन्न झाला. या विवाहप्रसंगी पलूस आणि कुंडल महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्याशी, भारतीय सैन्य दलातील बलस्थाने तसेच सैन्य दलातील अधिकारी भरतीसाठी  घ्यावयाचे प्रयत्न या विषयावर विद्यार्थ्यां व पालकांसाठी विशेष संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळाव्यात आयर्न मॅन विज...

शिवसेना शिंदे गटाचे धक्कातंञ..अनेक दिग्गजांचा पक्ष प्रवेश.

Image
 कोल्हापूर ( प्रतिनिधी) शिवसेना शिंदे गटाने आज कोल्हापूरातील सर्वच राजकीय पक्षांना धक्का देत अनेकांचा पक्षप्रवेश करून घेतला.या पक्ष प्रवेशाच्या मागं आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह सत्यजीत कदम आणी शारंगधर देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली.उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे,मंञी उदय सामंत,शंभुराज देसाई,पालकमंञी प्रकाश आबिटकर,खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांच्या उपस्थीतीत झालेल्या पक्षप्रवेशांमध्ये अनेक दिग्गजानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी माजी महापौर सरिता मोरे, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे,अजय इंगवले, नेपोलीयन सोनुले, उबाठाचे माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस,विवेक महाडिक,रणधीर महाडिक,माजी परिवहन समितीचे सभापती अजित मोरे,माजी नगरसेवक रमेश पोवार, सुभाष मोरे, राजू हुंबे,रत्नेश शिरोळकर, रमेश पुरेकर, मृदुला पुरेकर,प्रविण लिमकर,प्रसाद उगवे, रमेश भोसले, स्मिता माळी,रामचंद्र भाले,रवींद्र साळोखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष आर के पवार यांचे पुतणे रमेश पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करत आर के पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट...

उद्योजक महेश उत्तुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा...

Image
  कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील सामाजीक कार्यकर्त्ये आणी उद्योजक महेश उत्तुरे यांचा वाढदिवस मंगळवार दि.४ नोव्हेंबर रोजी  विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महेश उत्तुरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते जेवण वाटप, फळे वाटपांसह अनेक सामाजीक उपक्रम राबवण्यात आले.यावेळी मातोश्री वृध्दाश्रम मधील वृध्दांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी वृध्दांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच  आर्थिक मदत करण्यात आली. पांजरपोळ येथील गाईंना  चारा, गुळ-डाळ देण्यात आली.महेश उत्तुरेंना वाढदिवसानिमीत्य शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. यावेळीशिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक विनायक फाळके, प्रताप जाधव, संजय जाधव, संग्राम निंबाळकर, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, सचिन पाटील, प्रवीण केसरकर, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, प्रमोद पाटील यांच्यासह शहरातील  अनेक पक्ष- संघटनांचे पदाधिकारी,तरुण मंडळे,तालीम संस्...

रिपब्लीकन सेनेमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश

 कोल्हापूर ( प्रतिनिधी) : रिपब्लिकन सेनेची आज बैठक कोल्हापूरातील शासकीय विश्रामगृहात  पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली  या वेळी आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सुधाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला. सुभाष कांबळे, महादेव कांबळे,सौरभ कांबळे,संदीप कदम,अभिजीत कांबळे, आनंदा कांबळे या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.या प्रसंगी  जिल्हा अध्यक्ष बाबा कामत,  अर्जुन कांबळे,कोल्हापूर शहर अध्यक्ष राजविक्रम कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, महासचिव सागर कुरडे,सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.