कात्यायणी देवीचा भंडारा उत्सव उत्साहात संपन्न...
कळंबा ( प्रतिनिधी) : कोल्हापुरातील नवदुर्गापैकी एक असणाऱ्या कात्यायणी देवीचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. भंडारा उत्सवानिमित्त कात्यायणी देवीची त्रिपुरा सुंदरी स्वरूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.ही पुजा श्रीपुजक राजु गुरव,वैभव गुरव यांनी बांधली होती. यावेळी मंदीरात होम हवानासह विविध धार्मिक विधी पार पडले. तर महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.तसेच सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तर राञी फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. कात्यायणी देवस्थान समिती महाप्रसाद कमिटीचे अध्यक्ष अमर जत्राटे यांच्या नियोजनाखाली हा उत्सव पार पडला. आमदार अमल महाडिक यांच्यासह मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले.तर दिवसभरात पाच हजाराहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

Comments
Post a Comment