Posts

Showing posts from November, 2023

सारथी मार्फत पीएचडी साठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना सरसकट द्यावी.

Image
 कोल्हापूर प्रतिनिधी : सारथी संस्थेमार्फत पीएचडी शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते महाविकासआघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा जितके विद्यार्थी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना सरसकट व पीएचडी कन्फर्मेशन तारखेपासून शिष्यवृत्ती देण्यात येत होती. यावर्षी  सरकारने शिष्यवृत्ती सरसकट न देता फक्त दोनशे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब मराठा समाजातील अनेक उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून मागे पडतील, आधीच नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे मराठा तरुण नैराश्यात आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय युवा सेना कदापी सहन करणार नाही आपले महायुती सरकार जाणून-बुजून मराठा समाजाला शैक्षणिक प्रवाह पासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर 15 नोव्हेंबर 2023 च्या आधी पात्र सर्व विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन तारखेपासून पीएचडी शिष्यवृत्ती सरकारने जाहीर करावी, अन्यथा युवासेना विद्यार्थ्यांसह लोकशाही ...

धर्मादाय सह आयुक्तांच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार मुख्याध्यापक संघाच्या दैनंदिन कामकाजासाठी कार्यकारी मंडळाची बैठक : चेअरमन सुरेश संकपाळ

Image
 कोल्हापूर : प्रतिनिधी         मान.धर्मादाय सह आयुक्त यांच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसारच संघाचे दैनंदिन कामकाजासाठी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक घेण्यात येऊन या बैठकीत संघ हिताचे निर्णय घेतल्याची माहिती संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी दिली.        विद्याभवन, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन सुरेश संकपाळ होते.        यावेळी बोलताना श्री.संकपाळ म्हणाले,  धर्मादाय सहआयुक्त यांच्या ६ ऑक्टोबर रोजीच्या आदेशाच्या चौकटीत राहून त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार संघाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी कार्यकारी मंडळाची बैठक बोलविली होती पण काही विघ्नसंतोषी मंडळी संघाची नाहक बदनामी करुन सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सभासदांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये.          यावेळी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे संच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोह...