कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमीक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रविंद्र मोरे व उपाध्यक्ष पदी रघुनाथ कांबळे...
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमीक शिक्षक व सेवक पतसंस्था मर्यादीत कोल्हापूर या पतसंस्थेच्या नूतन अध्यक्षपदी रविंद्र यशवंत मोरे ,उपाध्यक्ष रघूनाथ बाबूराव कांबळे समिती सदस्यपदी राहूल माणगांवकर याची बिनविरोधी निवड झाली . ही निवड कोल्हापूर जिल्हाचे सहाय्यक उपनिबंधक के. एस ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी माजी अध्यक्ष रघुनाथ मांडरे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. जेष्ठ संचालक प्रकाश पोवार यांनी अध्यक्षपदासाठी रविंद्र मोरे यांच्या नाव सुचवले व त्यास संचालक दिलीप वायदंडे यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्षपदी रघुनाथ कांबळे यांच्या नाव संचालक योगेश वराळे यांनी सुचवले व संचालक संजय कांबळे यांनी अनुमोदन दिले . या प्रसंगी नूतन अध्यक्ष रविंद्र मोरे व उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी सभासद संख्या व ठेवी कर्जपुरवठा वाढीसाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करून पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख चढता ठेवून जास्तीत जास्त लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या वतीने आकर्षक ठेव योजना व कर्जावरील व्याज दर ह्या सालामध्ये अर्धा टक्का कमी करण्यात आल्याचे न...