कळंबा उपसरपंच बिनविरोध निवड

 

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काॅंग्रेसचे विकास पोवार - बावडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला . गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी नूतन उपसरपंच विकास पोवार - बावडेकर यांनी दिली .

 करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीवर काॅंग्रेसची सत्ता आहे . या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्नेहल जाधव यांनी ठरलेल्या कालावधीप्रमाणं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता . त्यामुळ नूतन उपसरपंच पदासाठी विकास भारत पोवार - बावडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता . त्यांच्या अर्जावर ग्रामपंचायत सदस्य रोहित मिरजे यांनी सूचक म्हणून सही केली होती . विकास पोवार - बावडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं, त्यांची कळंबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते नूतन उपसरपंच विकास पोवार -बावडेकर यांचा सत्कार करण्यात आला,तसंच मावळत्या उप सरपंच स्नेहल जाधव यांचाही सत्कार करण्यात आला . यावेळी स्नेहल जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिपक तिवले,उदय जाधव, पुनम जाधव, रोहित जगताप यांनी मनोगतं व्यक्त केली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकारी दिलीप तेलवी, तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते . निवडीनंतर विकास पोवार - बावडेकर यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत, तसच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला .

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...