Posts

Showing posts from February, 2026

आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून मंजित माने यांचे कौतुक...

Image
 मुंबई (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी युवासेनेच्या कोल्हापुरातील कार्याचा अहवाल मंजित माने यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.आमदार आदित्य ठाकरे यांनी मंजित माने यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केले. यावेळी मंजित माने यांनी युवा सेनेच्या आगामी उपक्रमांची माहिती आदित्य ठाकरे यांना दिली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी मंजीत माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

कोल्हापूरात सुरु झाले आहे आईस्र्कीम हब..

Image
 कोल्हापूर ( प्रतिनिधी): कोल्हापूरातील आईसस्र्कीम प्रेमींसाठी खुश खबर आहे.कोल्हापूरातील टाकाळा परीसरातील सिध्दीविनायक हाॅस्पीटलजवळ वनस्कायीज बिल्डींग मध्ये सुरु झाले आहे.सुप्रसिध्द इग्लु कंपनीचे आईस्र्कीम हब..या  आईस्र्कीम हबची खासीयत म्हणजे या ठीकाणी मीळणारी आईस्र्कीम डालडा विरहीत व शुध्द शहाकारी आईस्र्कीम मीळणार आहेत.या ठीकाणचे वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांच्या समोरच फ्रेश आईस्र्कीम बनवुन दिली जाणार आहेत.आईस्र्कीम बनवताना  उच्च प्रतीचे साॅस वापरले जातात.तर तब्बल पंचेचाळीस प्लेवअर मध्ये या ठीकाणी आईस्र्कीम मीळणार आहेत. यामध्ये शुगर फ्री,मील्क फ्री साॅरबेस्ट,दह्यापासुन बनवलेले आईस्र्कीम,इटालीयन पध्दतीची आईस्र्कीम, अशा शंभर टक्के शुध्द शहाकारी आईस्र्कीमचा समावेश  आहे.एवढेच न्हवे तर ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी कंपनीकडून प्रशीक्षीत कर्मचारी देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.या हब मध्ये सत्तर रुपये ते एकशे वीस रुपयांपर्यंत आईस्र्कीम उपलब्ध आहेत, इग्लु आईस्र्कीम हब हे वैष्णवी चव्हाण व यश चव्हाण यांच्या  व्यवस्थापनाखाली सुरु करण्यात आले आहे.याचा शुभारंभ आमदार राजेश क्षिर...

नगरसेवक प्रसाद चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी आज निवड करण्यात आली. निवडीनंतर नगरसेवक प्रसाद चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत प्रसाद चव्हाण यांची भव्य मिरवणूक काढली. शिवाजी पेठेतील वेताळ तालमीत मिरवणूक आल्यानंतर या ठिकाणी नगरसेवक प्रसाद चव्हाण यांनी आपले वडील सुजित चव्हाण यांची गाळात भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला. यानंतर त्यांनी  कुटुंबीयांबरोबर आपला आनंद व्यक्त केला.हा क्षण पाहण्यासाठी स्वर्गीय रामभाऊदादा चव्हाण आणि शिवाजीराव चव्हाण हवे होते अशी प्रतिक्रिया कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली. यामुळे काही काळ या ठिकाणी वातावरण भावुक झालं होते.तर गुलालाची उधळण करत प्रसाद चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण,अजित चव्हाण,गणेश रांगणेकर यांच्यासह चव्हाण कुटुंबीय आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूरातील पार्श्वनाथ बँकेत शिवजयंती उत्साहात साजरी...

Image
 कोल्हापूर ( प्रतिनिधी): कोल्हापूरातील पार्श्वनाथ बँकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष शंकर पाटील आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर चे अध्यक्ष विनोद मेहता तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील व उपस्थीत सर्व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.बँकेचे कुटुंब शंकर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपाध्यक्ष  विक्रम शहा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला .याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  जयसिंग पाटील, शंकर पाटील यांची भाषणे झालीत.कार्यक्रमास संचालक  अनिल शहा, विनोद ओसवाल, प्रमोद शहा,मौकतीक पाटील,पूनम शहा ,बाळासाहेब कांबळे व सर्व पदाधिकारी , अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.केवलसिंग रजपुत यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

शहीदा मुल्लाणी यांची निवड..

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): जायंट्स  ग्रुप ऑफ करवीर सहेली कोल्हापूर यांचा दुसरा शपथविधी व पदग्रहण समारंभ नुकताच कोल्हापूरात पार पडला. जायंट्स  ग्रुप ऑफ करवीर सहेली कोल्हापूरच्या अध्यक्षपदी  शाहिदा शौकत मुल्लानी यांची निवड करण्यात आली.  नयना  बडकस , सुमन पवार यांची उपाध्यक्षा तर  नीता भाडळकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.हा ग्रुप 15 सदस्यांच्या असून वेगवेगळे सामाजीक उपक्रम राबवत असतो.यामध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्याविषयी जनजागृती,पर्यावरण संवर्धन, शालेय  विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देणे अशी समाज उपयोगी कार्ये करत असतो.या कार्यक्रमाला डॉक्टर राजकुमार पोळ, जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या अनुजा पाटील, प्रकाश वरणे,शरदचंद्र दिवाण,प्रकाश कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभश्री वरणे तर आभार शकुंतला मोरे यांनी मानले.

प्रेम कुणावर करावे....

Image
व्हॅलेंटाईन डे स्पेशल   🔴 *Happy Valentine's Day..* ..."जमेल तसे प्रत्येकाने ... .....कुणावर तरी प्रेम करावे" ... कधी संमतीने ..कधी एकतर्फी .. पण, दोन्हीकडे हि सेम करावे ..!! प्रेम सखीवर करावे .. बहिणीच्या राखीवर करावे ..! आईच्या मायेवर करावे .. बापाच्या छायेवर करावे ..! प्रेम मुलावर/मुलीवर करावे ..जमल्यास , दिलदार शत्रूवर हि करावे ..! प्रेम मातीवर करावे .. निधड्या छातीवर करावे ..! प्रेम शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर...सचिन च्या खेळावर आणि  वारकऱ्यांच्या टाळावर हि करावे ! प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे .. प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!! प्रेम महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ... आणि , अगदी न चुकता स्वतःवर... जमेल तसे प्रेम करावे .!!!!!! पण.... *"जमेल तसे प्रत्येकाने ........कुणावर तरी नक्कीच प्रेम करावे...!!!!"* 🔴 *Happy Valentine's Day..* 💕💞💞

साखर कारखान्यात आता शासकीय वजन काटे बसणार....

Image
 जयसिंगपूर/पुणे (प्रतिनिधी) राज्यातील साखर कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या कथित काटामारी व रिकव्हरी चोरीच्या पार्श्वभूमीवर शासकीय वजनकाटे बसविण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर आयुक्त संजय कोलते यांनी वैद्यमापन विभागाच्या नियंत्रकांना राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शासकीय वजनकाटे उभारण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटामारी व रिकव्हरीत कपात करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करत काही कारखान्यांकडून गैरप्रकार होत असल्याचे नमूद केले आहे.चालू गळीत हंगामात एकूण गाळप झालेल्या ऊसाच्या सरासरी वजनात सुमारे १० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि ऊस तोडणी मजूर दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर प्रत्येक साखर कारखान्याच्या बाहेर जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि वजनमापे नियंत्रक यांच्या...

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

Image
 कोल्हापूर ब्रेकिंग( कोल्हापूर प्रतिनिधी)  कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील ६८ मतदार संघ..   विजय उमेदवार आणि त्यांचा राजकीय पक्ष..             याचा मतदारसंघ निहाय तपशील.. शाहुवाडी तालुका १. शित्तूर तर्फ वारूण -  सर्जेराव पेरीडकर (जनसुराज्य) २. सरूड - अमरसिंह पाटील (ठाकरे गट) ३. बांबवडे - राजकुवर गायकवाड ( राष्ट्रवादी) ४. आंबार्डे - स्नेहल वेल्हाळ (जनसुराज्य) पन्हाळा तालुका ५. सातवे - डॉ. जयंत पाटील (राष्ट्रवादी) ६. कोडोली -  अमरसिंह पाटील (अपक्ष) ७. पोर्ले तर्फ ठाणे - भगवान पाटील (राष्ट्रवादी) ८. यवलूज - पूजा पाटील (राष्ट्रवादी) ९. कोतोली- वर्षाराणी पाटील (शिवसेना) १०. कळे - शोभा बेलेकर (जनसुराज्य ) हातकणंगले तालुका ११. घुणकी - शुभांगी  कुंभार (काँग्रेस) १२. भादोले- सोनाली सावंत (काँग्रेस) १३. कुंभोज - शीतल यादव ( जनसुराज्य ) १४. आळते - वर्षा सावर्डेकर (शिवसेना) १५. शिरोली पुलाची - सलीम महात (भाजप) १६. रूकडी- आतिष शिंगे (शिवसेना) १७. रूई - राहुल आवळे (काँग्रेस) १८. कोरोची- सानिका आवाडे (भाजपा) १९. कबनूर - कुमार कांबळे (भाजप) २०. पट...

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

 कोल्हापूर ब्रेकिंग (प्रतिनिधी):  तालुक्यातील जिल्हा परिषद- पंचायत समिती उमेदवारनिहाय पडलेली मते. १) शिये जिल्हा परिषद गट  विश्वनाथ पाटील हामु (काँग्रेस)- १०३८८ विजयी   प्रदीप भुयेकर (भाजप).        -  ७३४० विश्वास पोवार (शिवसेना शिंदे )- ७९५७ नोटा.                                    -   १४२ शिये पंचायत समिती गण उमा पाटील (काँग्रेस).     - ४१५८ विजयी   शितल कदम (शिवसेना). - ३७१६  सुवर्णा काशीद (भाजप ) -  ३६९६  शिवाली पाटील (उभाठा ) - १३४८ माधुरी जाधव (अपक्ष).      - १०४  शोभा काशीद (अपक्ष )     २०६ नोटा.                              - ७७   निगवे दुमाला पंचायत समिती गण  रूपाली कुर्ले (शिवसेना ).  -६४५३ विजयी  पूजा माळी ( भाजप )        - २२७८ साक्षी कुंभार...

कोल्हापूरात गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा..

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापुरात आज गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी पेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शकुंतला सरनाईक  यांनी  गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यावेळी पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे, आरती वाळके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते  प्रसादाचे वाटप करण्यात आले.दिवसभरात असंख्य भावीकांनी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी मिना सरनाईक,  मनिषा साळोखे, मनाली सरनाईक, मंगल देसाई , गीता भोसले, शर्मिला भोसले, शालन चव्हाण, शकुंतला साळोखे, विद्या चौगले, राजश्री माने , मिना तिटवेकर यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

"डिजीटल पल्स आणि रीडींग फेअर " कार्यक्रम उत्साहात सपन्न

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): डी मार्ट CSR फौंडेशनच्या वतीने CSR फंडातून कोल्हापूर महापालीकेच्या प्राथमिक शिक्षण समिती कडील ७ शाळांमध्ये ' संगणक कक्ष व ग्रंथालय ' हा उपकम सुरू आहे. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून ते सातवी पर्यंत संगणकावरील विविध बाबी शिकवल्या जातात त्यामुळे विद्यार्थी संगणक साक्षर होण्यास मदत होत आहे .तसेच गोरगरिबांच्या मुलांना इयत्ता पहिलीपासून संगणक,  इंटरनेट साररख्या सुविधांमुळे आधुनिक तंत्रज्ञान मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी वाढलेली आहे तसेच या उपक्रमांमध्ये ग्रंथालयही उपलब्ध करून दिले  आहे. त्यामध्ये मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात . त्यामुळे विद्यार्थी वाचनप्रिय बनत चालले आहेत . अतिशय सुंदर असा उपक्रम डी मार्ट सीएसआर फाउंडेशन मधून सुरू आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य फर्निचर- पुस्तके इत्यादी डी मार्ट फाउंडेशन मधून पुरवली जातात' तसेच यासाठी शिक्षकांची ही नेमणूक केली आहे.डी मार्ट ने स्वतःच्या खर्चाने शिक्षकांची ही नेमणूक केली आहे . त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधून  पहिलीपासूनच ...

कंदलगाव येथील तरुण मंडळांचा विनिता भोगम यांना जाहीर पाठींबा

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात भाजपकडून महायुतीच्या विनिता सागर भोगम या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना कळंबा मतदार संघातील तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. विनिता भोगम यांना मत म्हणजे विकासाला मत हाच विचार करुन कंदलगाव येथील तरुण मंडळांनी भोगम यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये कंदलगाव येथील क्रांती चौक तरुण मंडळ, एकता फ्रेंड्स सर्कल व नेहरू युवा मंच या मंडळाचा समावेश आहे. या मंडळातील शेकडो कार्यकर्त्यांनी विनिता भोगम यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांचे रामचंद्र भोगम यांनी आभार मानले.

कळंबा मतदारसंघात लाडक्या बहिणीच गेम चेंजर ठरणार-आमदार अमल महाडिक

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये लाडक्या बहिणी ह्याच गेम चेंजर ठरणार आहेत. यामुळे विनिता भोगम यांचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी केले. कळंबा येथील प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते. विनिता भोगम यांच्या प्रचारासाठी आमदार अमल महाडिक यांनी कळंबा गावात ठिकठिकाणी गाठीभेटी घेतल्या. तसेच कोपरा सभा घेतल्या. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.कळंबा जिल्हा परिषद मतदार संघाच्या विकासासाठी विनिता भोगम ह्या भाजपच्या कमळ ह्या चिन्हावर निवडणुक लढवत आहेत.कमळ या चिन्हासमोरील बटण दाबुन विनिता भोगम यांना विजयी करण्याचे आहवान आमदार अमल महाडिक यांनी नागरीकांना केले. यावेळी कळंब्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिंगणापूर पंचायत समीतीच्या मतदारसंघाच्या विकासासाठी अमर जत्राटे यांना विजयी करा-खासदार धनंजय महाडिक

Image
 बालींगा ( प्रतिनिधी): शिंगणापूर पंचायत समिती मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप या चिन्हा समोरील बटन दाबून अमर जत्राटे यांना प्रचंड मताने विजयी करा असे आहवान खासदार धनंजय महाडिक यांनी केलं बालिंगा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. अमर जत्राटे यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यांनी जनतेसाठी केलेली आंदोलने याची पोचपावती म्हणून जनता त्यांना नक्की विजयी करेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. देशात आणी राज्यात भाजपचे सरकार आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये व पंचायत समितीमध्ये देखील भाजप व मीत्रपक्षांची सत्ता आल्यास भरघोस निधी आणून गावांसह जिल्ह्याचा विकास साधता येईल असेही खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना नमूद केले. प्रचार सभेला झालेली गर्दी पाहूनच अमर जत्राटे यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.सभेला शिंगणापूर पंचायत समीती मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह महीला,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 

कळंबा मतदारसंघाच्या सर्वाणगीन विकासासाठी विनिता भोगम यांना निवडुण द्या-खासदार धनंजय महाडिक

Image
 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार विनिता सागर भोगम यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आहवान खासदार धनंजय महाडिक यांनी केले.कळंबा येथील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. देशात व राज्यात महायुतीची सत्ता आहे,त्यामुळे महायुतीच्या विनिता भोगम यांना निवडून दिल्यास कळंबा मतदार संघात भरघोस निधी आणून कळंबा मतदार संघाचा विकास साधता येईल.अस खासदार महाडिक यांनी सांगीतले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबीटकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील,आमदार अमल महाडिक आणि माझ्या स्वतःच्या खासदार फंडाच्या निधीतून कळंबा मतदारसंघाचा सर्वाणगीन विकास करता येईल. त्यामुळे  विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या महायुतीच्या उमेदवार विनिता भोगम यांना आपलं बहुमोल मतदान देऊन निवडून द्या असे आहवान खासदार महाडिक यांनी केले.यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झालीत.सभेला कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.