कळंबा मतदारसंघात लाडक्या बहिणीच गेम चेंजर ठरणार-आमदार अमल महाडिक
कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये लाडक्या बहिणी ह्याच गेम चेंजर ठरणार आहेत. यामुळे विनिता भोगम यांचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी केले. कळंबा येथील प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते. विनिता भोगम यांच्या प्रचारासाठी आमदार अमल महाडिक यांनी कळंबा गावात ठिकठिकाणी गाठीभेटी घेतल्या. तसेच कोपरा सभा घेतल्या. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.कळंबा जिल्हा परिषद मतदार संघाच्या विकासासाठी विनिता भोगम ह्या भाजपच्या कमळ ह्या चिन्हावर निवडणुक लढवत आहेत.कमळ या चिन्हासमोरील बटण दाबुन विनिता भोगम यांना विजयी करण्याचे आहवान आमदार अमल महाडिक यांनी नागरीकांना केले. यावेळी कळंब्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Comments
Post a Comment