महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांच्या सहभागामुळे कळंब्याचे कुस्ती मैदान झाले लक्षवेधी...
कोल्हापूर (प्रतिनिधी): कळंबा गावचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त कळंबा येथे मंगळवारी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. या कुस्ती मैदानात राज्यस्तरीय मल्लांनी भाग घेतला होता. गेली सात वर्ष कुस्ती क्षेत्राला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम हे विशेष प्रयत्न करत आहेत. दरवर्षी ते प्रथम क्रमाकांचे बक्षीस देत आले आहेत.याहीवर्षी सागर भोगम आणि संतोष लोहार यांनी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. यामुळे या कुस्ती मैदानाकडे संपूर्ण करवीर तालुक्याचे लक्ष लागून राहिलं होतं. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या दोन कुस्त्या खेळवण्यात आल्या. या कुस्ती मैदानात हसन पटेल उपमहाराष्ट्र केसरी आणि सोनू कुमार पंजाब केसरी यांची लढत झाली यामध्ये हसन पटेल यांनी सोनू कुमार याला चितपट करून विजय मिळवला. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये कुस्ती झाली. मात्र ही कुस्ती कंटाळवाणी झाली. दोन्ही मल्लांनी फक्त बचावाचा पवित्रा घेतल्यामुळे ही कुस्ती तब...