कळंबा येथे भव्य मिरवणुक सोहळा संपन्न...

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी) :करवीर तालुक्यातील कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई  देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी कळंबा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून साकारलेली चांदीची पालखी व देवीची चांदीची उत्सव मूर्ती वाजत गाजत गावात आणण्यात आली. कळंबा येथील भाजी मंडई पासून चांदीच्या पालखीची आणि चांदीच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत धनगरी ढोल आणि लेझीम पथक सामील झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.  या मिरवणुकीमध्ये शेकडो भक्तगण सहभागी झाले होते. यावेळी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे पालखी आल्यानंतर भव्य आतीषबाजी करण्यात आली. यावेळी गावच्या सरपंच सुमन गुरव ,बाजीराव पोवार, प्रकाश कदम, उमेश भवड, विश्वास गुरव, विजय खानविलकर,दिलीप मीरजे, विश्वास खानविलकर, शशिकांत तिवले,सुरेश नाईक,रणजीत कोंडेकर,भगवान पाटील,उत्तम जाधव,अरुण टोपकर,कृष्णात जंगम यांच्यासह  महीला, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते…


Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...