केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पुर्ण करा-अन्यथा आंदोलन..
केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने-बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचा जनआंदोलनाचा इशारा. कोल्हापूर (प्रतिनिधी) दिनांक २५:- महाराष्ट्राच्या मुख्य सांस्कृतिक केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्षस्थानी पडले. या घटनेला आता तब्बल दोन वर्षे पूर्ण होत आहेत.नाट्यकर्मींचा रेटा, कोल्हापुरातील संघटनांचा दबाव यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात झाली खरी.. परंतु अत्यंत कासव गतीने चालणारे हे काम प्रशासनाच्या सुस्तपणामुळे दिवसेंदिवस प्रलंबित पडत आहे. कोल्हापूरच्या जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणात होत असणारा विलंब हा रंगकर्मीबरोबरच कोल्हापूरच्या जनतेला वेदनादायी तसेच संतापजनक ठरणारा आहे.नाट्यगृहाच्या पार्किंगचे काम संपूर्ण रखडले आहे. नाट्यगृहातील बाहेरच्या परिसरातील कामे संपूर्णपणे ठप्प असून, नाट्यगृहाच्या आतील भागाचे नूतनीकरण अर्धवट अवस्थेत आहे. अतिशय संथपणाने काम चालू असल्यामुळे एक वर्षात हे नाट्यगृह पूर्ण होईल अशी प्रशासनाची घोषणा ही निव्वळ वल्गना ठरली आहे. स्वच्छतागृह, पार्किंगची सु...