मराठा समाजाबरोबरच बहूजन समाजाचा विकास साधुया-बन्सीदादा डोके


 राष्ट्रीय मराठा महासंघाच्या शहराध्यक्षपदी सागर चौगले यांची निवड..


कोल्हापूर(प्रतिनिधी):  महाराष्ट्रात कार्यरत असणारी राष्ट्रीय मराठा महासंघ या संघटनेच्या कोल्हापूर शहराच्या अध्यक्षपदी सागर चौगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या मराठा बांधवांच्या मेळाव्यात त्यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून उदयसिंग खोत, कुलदीप सावरतकर यांचीही नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नगरसेवक सुनील वाडकर, जिल्हा समन्वयक म्हणून माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, जिल्हा सरचिटणीस म्हणून राज बडकस, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत पाटील, युवराज पाटील, अमर जत्राटे तर जिल्हा सचिव म्हणून दत्तात्रय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा वहातुक संघटनेच्या अध्यक्षपदी दिपक पाटील तर कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी सुनिल पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी बोलताना बन्सीदादा डोके यांनी राष्ट्रीय मराठा महासंघ ही संघटना मराठा समाजाबरोबरच बहुजन समाजासाठी काम करणारी संघटना आहे. यामुळे जात भेद न मानता आपण बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास करूया असे आहावान केले. तर नूतन शहराध्यक्ष सागर चौगले यांनी राष्ट्रीय मराठा महासंघाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून सामाजिक कार्यात वेगळा ठसा निर्माण करणार असे सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष विष्णू बिराजदार,साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ,नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संताजी पाटील,अतुल शिंदे,उमेश दुरुंदे,राजेश भोईर यांच्यासह कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने  उपस्थीत होते.



Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...