Posts

Showing posts from March, 2026

अन्यथा महापालिकेला टाळे ठोकु-कृती समीतीचा इशारा...

Image
 कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती आक्रमक.. जल अभियंता श्री.हर्षजीत घाटगे यांना घेराव..!! कोल्हापूर(प्रतिनिधी) दि.२३- १९४६ साली बांधण्यात आलेले हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेले कळंबा फिल्टर हाऊस निम्म्या कोल्हापूर शहराची तहान भागवते. गेली अनेक वर्षे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कळंबा फिल्टर हाऊस ची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याबाबत बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने संस्थापक किसनराव कल्याणकर,अध्यक्ष रामेश्वर पतकी, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, पद्माकर कापसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे.शुक्रवारी या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी येऊ शकले नव्हते. यावेळी बी वॉर्ड अन्याय निवड कृती समितीने इशारा देत सोमवारी अधिकारी न आल्यास टाळा ठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापूर महापालिकेचे जलअभियंता  इंद्रजीत घाटगे, उपजलअभियंता रावसाहेब चव्हाण आणि कळंबा फिल्टर हाऊस चे राजेंद्र हुजरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित झाले.बी वॉर्ड अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचबरोबर ...

कुस्ती पंढरीचा प्रवास...

Image
 कोल्हापूर(प्रतिनिधी): केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते – 1961- औरंगाबाद- दिनकर दहय़ारी 1962- धुळे- भगवान मोरे 1963- सातारा- स्पर्धा रद्द 1964- अमरावती- गणपत खेडकर 1965- नाशिक- गणपत खेडकर 1966- जळगाव- दिनानाथ सिंह 1967- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ 1968- अहमदनगर- चंबा मुतनाळ 1969- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार 1970- पुणे- दादू चौगुले 1971- अलिबाग, रायगड- दादू चौगुले 1972- कोल्हापूर- लक्ष्मण वडार 1973- अकोला- लक्ष्मण वडार 1974- ठाणे- युवराज पाटील 1975- चंद्रपूर- रघुनाथ पवार 1976- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर 1977- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित 1978- मुंबई- आप्पासाहेब कदम 1979- नाशिक- शिवाजीराव पाचपुते 1980- खोपोली, रायगड- इस्माईल शेख 1981- नागपुर- बापू लोखंडे 1982- बीड- संभाजी पाटील 1983- पुणे- सरदार खुशहाल १९८४- सांगली- नामदेव मोळे 1985- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर 1986- सोलापूर- गुलाब बर्डे 1987- नागपुर- तानाजी बनकर 1988- अहमदनगर- रावसाहेब मगर 1989- वर्धा- अनिर्णित 1990- कोल्हापूर- अनिर्णित 1991- अमरावती- अनिर्णित 1992- पुणे- आप्पालाल शेख 1993- बालेवाडी, पुणे- उदयर...

गुढीपाडव्या मुहूर्ताबाबत सवीस्तर माहीती...

Image
 🔸 *गुढी पाडवा 2026 मुहूर्त...*🌼🚩 🔹 *गुढी_पाडवा :-* गुरुवार, 19 मार्च 2026  मुख्य तिथी *चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू:-* 19 मार्च 2026 सकाळी 6:52 am चैत्र शुक्ल प्रतिपदा समाप्त: 20 मार्च 2026 पहाटे 4:52 am *गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त* गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तरीही गुढी उभारण्यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो.  *सर्वोत्तम वेळ (सकाळी):-* सूर्योदयानंतर ते सुमारे 10:30 वाजेपर्यंत साधारण 6:35 AM ते 10:30 AM *गुढी पाडवा पूजा विधी (सोप्या पद्धतीने)* सकाळची तयारी लवकर उठून अभ्यंग स्नान करा. घराची स्वच्छता करून दारासमोर रांगोळी काढा घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची/कडुलिंबाची तोरण लावा देवघर स्वच्छ करून दिवा लावा गुढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बांबूची काठी स्वच्छ रेशीम/नवीन कापड (पिवळे, केशरी, हिरवे चालते) साखरेच्या गाठी / गाठी कडुलिंबाची पाने आंब्याची पाने फुलांचा हार तांब्या/चांदी/स्टीलचा लोटा (उलटा ठेवण्यासाठी) हळद-कुंकू, अक्षता अगरबत्ती, दिवा, नैवेद्य गुढी कशी उभारावी बांबूला स्वच्छ कापड बांधा त्यावर फुलांचा हार, ...

गुढीपाडव्या शुभ मुहूर्तावर विशेष सवलतीत प्लाॅट खरेदीची सुवर्णसंधी...

Image
 कोल्हापूर - भोगम बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उपलब्ध केली आहे  विशेष सवलती मध्ये प्लॉट खरेदीची सुवर्णसंधी.कोल्हापूरसह वारणानगर,पेठवडगाव,नागोबाचीवाडी,अंबप फाटा,हणबरवाडी,शिंगणापूर,वाडीपीर,कळंबा,बांबवडे या ठिकाणी गटर्स,लाईट,रस्त्यांसह सर्व सोयीनियुक्त  सुसज्ज प्लॉटिंगचे प्रोजेक्ट.सर्वसामान्य नागरीकांना परवडेल असे माफक दर, खात्रीशीर आणि कायदेशीर व्यवहार. आपुलकीची सेवा देणारे भोगम बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या प्लाॅटींगच्या प्रोजेक्ट मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा आणि गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणीत करा. आमचा पत्ता आहे.भोगम असोसिएटस,लँन्ड डेव्हलपर्स अँण्ड बिल्डर्स,गुळलाईन,श्री शाहू मार्केट यार्ड,कोल्हापूर. मोबाईल नंबर 9921229292 आणी 9823349292 

सामाजीक क्षेत्रातील योगदानाबद्दल सरीता सासने यांचा सन्मान...

Image
 कोल्हापूर( प्रतिनिधी): सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जागतिक महिला दिनानिमित्त पद्माराजे संवर्धन समितीच्या वतीने  शकुंतला आंब्रे व बाबुराव आंब्रे यांच्या हस्ते पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांना शाल व  गुलाबाचे रोप देवून गौरवण्यात आले.यावेळी बोलताना सरीता सासने यांनी आपल्याला आतापर्यंत केलेल्या सामाजीक कार्याबद्दल अनेक सत्कार  झालेत अनेक पुरस्कार मीळालेत मात्र पद्माराजे संवर्धन समीतीकडून केलेला सन्मान हा आपल्याच घरातील सदस्यांनी केलेला सन्मान असल्यामुळे मीळालेल्या सर्व पुरस्कारापेक्षा मोठा असुन हा सन्मान मला पुढील सामाजीक कार्यासाठी निश्चीतच प्रोत्साहन देणारा असल्याचे सांगीतले.यावेळी पद्माराजे उद्यान संवर्धन समितीचे अमर मोरे, विलास पोवार , हिंदुराव मोरे, विजय माने, अविनाश पाटील, शिवाजी आंब्रे, दत्तात्रय सुतार , शशिकांत आंब्रे यांच्यासह पद्माराजे महिला संघटनेच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेष सवलतीत प्लाॅट खरेदीची सुवर्ण संधी...

Image
 कोल्हापूर ( प्रतिनिधी): कोल्हापूर पासून जवळ असणाऱ्या पेठ वडगाव येथे भोगम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे.या प्रकल्पाचे भुमीपुजन सुप्रसिध्द उद्योजक  बाजीराव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोगम बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे चेअरमन रामचंद्र भोगम,दत्तात्रय घुगरे,रणजीत यादव,आनंद माने,राजीव परीख, चेतन वसा, बाळासो खाडे, रामचंद्र भोगम, एडव्होकेट राजवर्धन पाटील, मनोहर परीट, वरद दीक्षित, शिवराज खाडे, सलीम जमादार, प्रवीण घोरपडेयांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पेठवडगाव येथील आदर्श विद्यानिकेतन आणी ज्युनिअर काॅलेजच्या समोर तब्बल आठरा एकरामध्ये बिगरशेती रहीवासी साकारण्यात येणार्‍या या प्लाॅटींगच्या प्रोजेक्टमध्ये एक गुंठ्यापासून तीन गुंठ्यापर्यंत माफक दरामध्ये प्लॉट उपलब्ध आहेत. कोल्हापूर शहरात वाढती लोकवस्ती  लक्षात घेऊन  भोगम बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सने कोल्हापूर शहरापासुन जवळच असणार्‍या आणी सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा माफक दरात पेठवडगाव येथे हा नवीन प्लॉटिंगचा प्रोजेक्ट सुरू केला आहे.गुढी...

सर्वसामान्य जनतेचे आधारवड असणार्‍या स्वर्गीय शिवाजीराव कदमांच्या पुतळ्याचे आनावरण..

Image
  कदमवाडी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, स्वर्गीय शिवाजीराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न…. कोल्हापूर : ( सागर चौगले,मुख्य प्रतिनिधी) कोल्हापूरच्या, समाजकारण आणि कृषी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व, माजी महापौर व गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक स्व. शिवाजीराव कदम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण  भावपूर्ण वातावरणात पार पडले.स्व. शिवाजीराव कदम यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला शिवाजीराव कदम यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना महापौर रुपाराणी निकम म्हणाल्या  "शिवाजीराव कदम यांनी नेहमीच प्रगतीशील शेतकरी आणि समाजसेवक म्हणून दीनदलितांच्या आणि सामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतला.तसेच संस्थेच्या सभासदांच्या आर्थिक गरजा तत्परतेने भागाव्यात यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात केली. यामुळे  निश्चितच हे स्मारक एक स्फूर्तीस्थान ठरेल.”तर संस्थेचे चेअरमन शशिकांत शिवाजीराव कदम यांनी “हा पुतळा म्हणजे केवळ एक स्मार...

आजीचा बटवा पुस्तकाचे प्रकाशन...

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): पतंजली किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी योगशिक्षक  अशोक पालकर संकलित व लिखित 'आजीचा बटवा 'पारंपारिक घरगुती उपाय, या पुस्तकाचे प्रकाशन योगऋषी  रामदेवजी महाराज यांचे परम शिष्य तसेच हरीव्दार येथील  भारत स्वाभिमान ट्रस्टचे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थ देवजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी स्वामी परमार्थदेवजी यांची प्रमुख उपस्थिती होती. पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी चंद्रशेखरजी खापणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी  पुस्तकाचे लेखक  योगशिक्षक अशोक पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .पतंजली राज्यसंरक्षक बापूजी पाडळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून अशोक पालकर यांच्याकडून अशी उत्तम दर्जेदार पुस्तके निर्माण होऊन चांगले समाज उपयोगी कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. स्वामी परमार्थ देवजी यांनी योग गंगा घरोघरी राष्ट्रहित सर्वपरी, स्वदेशीचा वापर,  संस्कारक्षम पिढी घडवण्याचा संकल्प, तसेच रोगमुक्त ,आरोग्य युक्त जीवन घडविण्याचा मंत्र दिला. कार्यक्रमास पतंजली जिल्हा संरक्षक सनमती मिरजे, पतंजली योग परिवाराचे युवा प्रभार...

संघर्ष योध्दा असणार्‍या महीलांचा सत्कार..

Image
 कोल्हापूर(प्रतिनाधी):  शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वयाच्या ९३व्या वर्षी शेनी लावून त्यांची विक्री करून घराला हातभार लावणाऱ्या तसेच आपल्या खेळाचे छंद जोपासत एखाद्या तरुणीला देखील लाजवेल अशा जात्यावरील ओव्या, सुप  नाचवणे, घागर घुमावणे काटवट कणा,या खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या सोनाबाई विलास पवार आणि मीळेल ते काम करुन मुलगा आणि सून यांच्या मृत्यूनंतर आपल्या एक महीन्याच्या आणी अडीच वर्षांच्या लहान नातवंडांचे संगोपन करत त्यांच्या शिक्षणासह लग्न लावुन देण्यापर्यंत जबाबदारी पार पाडणार्‍या पंच्याऐंशी वर्षांच्या आनंदी शामराव चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी दोन्ही आदर्शवत मातांच्या हस्ते केक कापुन महीला दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.याप्रसंगी बोलताना पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरीता सासने यांनी समाजातील महिला वर्गाने सोनाबाई पवार व आनंदी चव्हाण यांच्या संघर्षमय कार्याचा आदर्श घेऊन प्रेरणा घ्यावी असे आहवान केले.यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या सचिव आरती वाळके, शोभा  मिठारी, शकुंतला...

जागतीक महीला दिनानिमीत्य 'सक्षम' या शाॅर्टफील्मचे अनावरण..

Image
 कोल्हापूर (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर ब्रेकिंग वर महिला सक्षमीकरणावर आधारित 'सक्षम'  ही शॉर्ट फिल्म कोल्हापूर ब्रेकिंगवर आठ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. 'सक्षम' या शॉर्ट फिल्मची संकल्पना व निर्मीती पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे यांची असून या शॉर्ट फिल्मची कथा- पटकथा  कीर्तीकुमार पाटील यांची आहे. तर या शॉर्ट फिल्म मध्ये शुभम सासणे आणि ज्योती कळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सिने अभिनेत्री दिपाली सय्यद,पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा सरिता चौगले ह्या पाहूण्या भुमीकेत दिसणार आहेत.या शॉर्ट फिल्मची निर्मिती व्यवस्था सागर चौगले यांनी पाहिली आहे. याचे मीडिया पार्टनर कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज चॅनेल व संवाद प्रतिवाद न्यूज पेपर हे आहेत.महीला सक्षमीकरणासाठी सामाजीक उपक्रमात सदैव सहभागी असणारे कळंबा येथील केसरकर हाॅस्पीटलचे विशेष सहकार्य या शाॅर्ट फील्मला लाभले आहे. महिला दिनानिमित्त सक्षम ही शॉर्ट फिल्म नक्की पहा.

आय.टी पार्कसाठी शेंडा पार्क येथील जागेला मंत्रीमंडळाची मंजुरी-आमदार राजेश क्षीरसागर

Image
                                                                     (संग्रहीत फोटो) आय.टी.पार्क साठी शेंडा पार्क येथील ३४.३६ हेक्टर जागेस मंत्रिमंडळाची मंजुरी: आमदार राजेश क्षीरसागर यांची माहीती. कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव आणला. यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल. कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ...

छत्रपती शाहू मिल्सचा होणार कायापालट,मुंबईत महत्वपुर्ण बैठक संपन्न..

Image
 छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता- वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांची माहीती. मुंबई दि.०५(प्रतिनिधी) :  राजर्षी छत्रपती शाहू महाराज आधुनिक कोल्हापूरचे  जनक आहेत. त्यांनी सर्वांगीण प्रगतीसाठी क्रांतिकारी पावले उचलली. त्यातील एक म्हणजे कोल्हापूरवासीयांची अस्मिता असलेली छत्रपती शाहू मिल्स काळाच्या ओघात बंद पडली. या गिरणीच्या स्थापनेमागे राजर्षी शाहू महाराजांचे अनेक दूरदृष्टीचे आणि कल्याणकारी उद्देश होते. कोल्हापूरला केवळ शेतीवर अवलंबून न ठेवता औद्योगिकीकरणाची सुरुवात करणे. सामान्य नागरिकांना आणि गरीब जनतेला दर्जेदार कापड माफक दरात उपलब्ध करून देणे. संस्थानातील जनतेने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि व्यापार-उद्योगात प्रगती करावी, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, या उद्देशाने त्यांनी या मिल्सला स्वत:ची जागा व आर्थिक पाठबळ देवून चालना दिली. अशा या पवित्र जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला व विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाईल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद...

मंत्रालयात छत्रपती शाहू मील बाबत महत्वाच्या बैठकीचे आयोजन-आम.क्षीरसागर

Image
 सागर चौगले(मुख्य प्रतिनिधी) कोल्हापूर दि.०२(प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना छत्रपती शाहू मिल येथील स्मारकाचा कामास सुरवात व्हावी, अशी अपेक्षा समस्त शाहू प्रेमी आणि कोल्हापूर वासियांकडून व्यक्त होत असल्याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी लेखी पत्राद्वारे  कळविले होते. त्या अनुषंगाने वस्त्रोद्योग मंत्रालयाने "कॅबिनेटसाठी प्रस्ताव मागवावा" असे निर्देश दिले होते. याच बरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर येथील छत्रपती शाहू मिल येथे प्रस्तावीत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारून परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून त्यास महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ मध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे आमदार क्षीरसागर यांनी केली होती. या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री. शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाकरिता जागेचे हस्तांतरण करणेबाबत वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या  अध्यक्ष...

शंभरहून अधिक कोल्हापूरकर संकटात...

Image
 कोल्हापूर ( सागर चौगले-मुख्यप्रतिनिधी) पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे दुबई येथे कोल्हापूर व सांगलीतील पर्यटक अडकून पडले आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्हा टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.सुरज नाईक यांनी सांगीतले की, “कोल्हापूरमधील सुमारे १५० पर्यटक आणि सांगलीतील एका कॉर्पोरेट समूहातील २०० जण सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. पश्चिम आशियातील युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना परतीचा मार्ग मिळत नाही. त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत.” या शिवाय येत्या दोन महिन्यांत सुमारे २५०० पर्यटकांनी परदेश दौऱ्यांची नोंदणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे या सर्व सहली अनिश्चिततेच्या छायेत आल्या आहेत.नाईक यांनी सांगितले की, “मागील काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय सतत अडचणीत सापडत आहे. आधी कोरोना महामारीमुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि विविध देशांतील युद्धस्थितीमुळे पर्यटन क्षेत्रावर सातत्याने परिणाम होत आहे. व्यवसाय सावरत असतानाच पुन्हा नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.”दुबईत अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षितते...