सर्वसामान्य जनतेचे आधारवड असणार्‍या स्वर्गीय शिवाजीराव कदमांच्या पुतळ्याचे आनावरण..

 

कदमवाडी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, स्वर्गीय शिवाजीराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न….

कोल्हापूर : ( सागर चौगले,मुख्य प्रतिनिधी)

कोल्हापूरच्या, समाजकारण आणि कृषी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व, माजी महापौर व गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक स्व. शिवाजीराव कदम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण  भावपूर्ण वातावरणात पार पडले.स्व. शिवाजीराव कदम यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला शिवाजीराव कदम यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना महापौर रुपाराणी निकम म्हणाल्या  "शिवाजीराव कदम यांनी नेहमीच प्रगतीशील शेतकरी आणि समाजसेवक म्हणून दीनदलितांच्या आणि सामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतला.तसेच संस्थेच्या सभासदांच्या आर्थिक गरजा तत्परतेने भागाव्यात यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात केली. यामुळे  निश्चितच हे स्मारक एक स्फूर्तीस्थान ठरेल.”तर संस्थेचे चेअरमन शशिकांत शिवाजीराव कदम यांनी “हा पुतळा म्हणजे केवळ एक स्मारक नसून, संस्थेच्या आणि सभासदांच्या उन्नतीसाठी सातत्याने विधायक कार्य करण्यासाठी आम्हा सर्व संचालकाना आणि सभासदांना प्रेरणा देणारे ऊर्जास्थान ठरेल. संस्थेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या आपल्या संस्थापकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुतळ्याची उभारणी करण्यात आल्याची माहिती दिली.”या सोहळ्याला जिल्हयाचे जेष्ठ नेते  माजी आमदार महादेवराव महाडीक,  श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील,आमदार अमल महाडीक ,शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, शिवसेनेचे नेते सत्यजीत (नाना) कदम,जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील, कोल्हापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर, कमर्शियल बँकेचे अध्यक्ष अतुल शहा, सत्यशोधक स्व. शामराव शिंदे सहकारी बँकेचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, माजी महापौर सुनील कदम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, ऋतुराज क्षीरसागर, रत्नेश शिरोळकर, नीलिमा पाटील, कौसर बागवान,गटनेता मुरलीधर जाधव, निलेश देसाई, अशोक जाधव,अभिजीत खतकर,अभय तेंडुलकर,वैभव कुंभार,भगवानराव काटे ,नगरसेवक स्वरूप कदम, वैभव माने ,विजयेंद्र माने, प्रमोद देसाई, राजनंदा महाडीक, वंदना मोहिते, अर्चना पागर, प्राजक्ता जाधव ,  विविध बँका आणि पतसंस्था यांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, सभासद, हितचिंतक , ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...