जागतिक महिला दिन उत्साहात साजरा....
कोल्हापूर (प्रतिनिधी): पतंजली योग वर्ग सनगर गल्ली तालीम मंडळ ,पहिला मजला मंगळवार पेठ कोल्हापूर येथे, जागतिक महिला दिनानिमित्त भारत स्वाभिमान न्यास, जिल्हा प्रभारी शांताराम पाटील यांचे उपस्थितीत आणि पतंजली परिवारातील ज्येष्ठ योगशिक्षक *श्री सूर्यकांत गायकवाड यांचे नियोजनातून महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित पतंजली योग वर्गातील व परिसरातील योगशिक्षिका सह.योगशिक्षिका ,साधक महिलावर्ग आणि पतंजली परिवारातील जोडलेली सर्व महिला वर्ग यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले. समुपदेशनच्या पहील्या सत्रा डॉक्टर केतकी बंकापुरे, या मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या असून त्यांनी व्यक्तिमत्व आणि नवमाताना येणारे नैराश्य यामध्ये पीएचडी केलेली आहे. डॉक्टर केतकी बंकापुरे यांनी प्रत्येक जिवात लपलेल्या स्त्री शक्तीला वंदन करून प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो , महिलानी स्वतःला प्रोत्साहन द्यावे, स्त्रीत्वाचे नीट रक्षण क...