जागतिक महिला दिन उत्साहात साजरा....
कोल्हापूर (प्रतिनिधी): पतंजली योग वर्ग सनगर गल्ली तालीम मंडळ ,पहिला मजला मंगळवार पेठ कोल्हापूर येथे,
जागतिक महिला दिनानिमित्त भारत स्वाभिमान न्यास, जिल्हा प्रभारी शांताराम पाटील यांचे उपस्थितीत आणि पतंजली परिवारातील ज्येष्ठ योगशिक्षक *श्री सूर्यकांत गायकवाड यांचे नियोजनातून महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित पतंजली योग वर्गातील व परिसरातील योगशिक्षिका सह.योगशिक्षिका ,साधक महिलावर्ग आणि पतंजली परिवारातील जोडलेली सर्व महिला वर्ग यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खालील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले.
समुपदेशनच्या पहील्या सत्रा डॉक्टर केतकी बंकापुरे, या मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या असून त्यांनी व्यक्तिमत्व आणि नवमाताना येणारे नैराश्य यामध्ये पीएचडी केलेली आहे.
डॉक्टर केतकी बंकापुरे यांनी प्रत्येक जिवात लपलेल्या स्त्री शक्तीला वंदन करून प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो , महिलानी स्वतःला प्रोत्साहन द्यावे, स्त्रीत्वाचे नीट रक्षण करून स्त्री शक्तीची जोपासना केली तर स्त्रीमध्ये स्वतःबरोबरच विश्वालाही प्रतिष्ठित करण्याचे सामर्थ्य आहे असे मत मांडले.
समुपदेशनच्या दुसर्या सञात कुमारी सायली आनंद देवधर या समर्थ भक्त रामदासी कीर्तनकार असून, परंपरेतील रामदासी कीर्तनाचे मार्गदर्शन गेली 7 वर्षे करीत आहेत, विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये त्या सहशिक्षिका म्हणून काम करत आहेत.
त्यांनी आपल्या अभंग वाणीतून टाळ मृदंगाच्या गजरात नामस्मरण, मेडिटेशन, कीर्तन, भक्ती योग, ज्ञानयोग, तसेच अध्यात्मिक जीवनाची सप्तपदी यांना वेण्णास्वामी यांनी सांगितलेचे त्यांचे कीर्तनातून प्रबोधन केले.
नवधाभक्ती चे महत्व पटवून देऊन त्यांनी कीर्तनातील आपल्या आवाजाची उंची, अभंगवाणी ,भाव मुद्रा ,टाळ मृदंगाच्या गजरात प्रबोधन केले.
दोन्ही कार्यक्रमाला महिलांवर्ग संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती . सनगर गल्ली योगवर्गातील सर्व महिलांच्या वतीने , गोळे वहिनी , माळी वहिनी ,गायकवाड वहिनी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून शांतीपाठ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments
Post a Comment