गुढीपाडव्या मुहूर्ताबाबत सवीस्तर माहीती...
🔸 *गुढी पाडवा 2026 मुहूर्त...*🌼🚩
🔹 *गुढी_पाडवा :-* गुरुवार, 19 मार्च 2026
मुख्य तिथी
*चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू:-* 19 मार्च 2026 सकाळी 6:52 am
चैत्र शुक्ल प्रतिपदा समाप्त: 20 मार्च 2026 पहाटे 4:52 am
*गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त*
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तरीही गुढी उभारण्यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो.
*सर्वोत्तम वेळ (सकाळी):-*
सूर्योदयानंतर ते सुमारे 10:30 वाजेपर्यंत
साधारण 6:35 AM ते 10:30 AM
*गुढी पाडवा पूजा विधी (सोप्या पद्धतीने)*
सकाळची तयारी
लवकर उठून अभ्यंग स्नान करा.
घराची स्वच्छता करून दारासमोर रांगोळी काढा
घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची/कडुलिंबाची तोरण लावा
देवघर स्वच्छ करून दिवा लावा
गुढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
बांबूची काठी
स्वच्छ रेशीम/नवीन कापड (पिवळे, केशरी, हिरवे चालते)
साखरेच्या गाठी / गाठी
कडुलिंबाची पाने
आंब्याची पाने
फुलांचा हार
तांब्या/चांदी/स्टीलचा लोटा (उलटा ठेवण्यासाठी)
हळद-कुंकू, अक्षता
अगरबत्ती, दिवा, नैवेद्य
गुढी कशी उभारावी
बांबूला स्वच्छ कापड बांधा
त्यावर फुलांचा हार, साखरेच्या गाठी, कडुलिंब-आंब्याची पाने लावा
वरती उलटा तांब्या/लोटा ठेवा
घराच्या उजव्या बाजूला / खिडकीत / गॅलरीत उंच ठिकाणी गुढी उभारा
गुढीला हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा
2) *पूजा_करताना म्हणायचे मंत्र :-*
सूर्य प्रार्थना
ॐ सूर्याय नमः।
शुभारंभ मंत्र
ॐ श्री गणेशाय नमः।
गुढी पूजनासाठी
ॐ ब्रह्मध्वजाय नमः।
ॐ विजयध्वजाय नमः।
समृद्धीसाठी
ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः।
नववर्ष मंगल मंत्र
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥
3) *गुढी पाडव्याचा खास प्रसाद :-*
कडुलिंब + गूळ खाणे शुभ मानतात
*याचा अर्थ :-*
*जीवनात गोड-तिखट-कडू सर्व अनुभव स्वीकारून पुढे जाणे.*

Comments
Post a Comment