आजीचा बटवा पुस्तकाचे प्रकाशन...
कोल्हापूर (प्रतिनिधी): पतंजली किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी योगशिक्षक अशोक पालकर संकलित व लिखित 'आजीचा बटवा 'पारंपारिक घरगुती उपाय, या पुस्तकाचे प्रकाशन योगऋषी रामदेवजी महाराज यांचे परम शिष्य तसेच हरीव्दार येथील भारत स्वाभिमान ट्रस्टचे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थ देवजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी स्वामी परमार्थदेवजी यांची प्रमुख उपस्थिती होती. पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी चंद्रशेखरजी खापणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पुस्तकाचे लेखक योगशिक्षक अशोक पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .पतंजली राज्यसंरक्षक बापूजी पाडळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून अशोक पालकर यांच्याकडून अशी उत्तम दर्जेदार पुस्तके निर्माण होऊन चांगले समाज उपयोगी कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. स्वामी परमार्थ देवजी यांनी योग गंगा घरोघरी राष्ट्रहित सर्वपरी, स्वदेशीचा वापर, संस्कारक्षम पिढी घडवण्याचा संकल्प, तसेच रोगमुक्त ,आरोग्य युक्त जीवन घडविण्याचा मंत्र दिला. कार्यक्रमास पतंजली जिल्हा संरक्षक सनमती मिरजे, पतंजली योग परिवाराचे युवा प्रभारी नवनाथ पाटील, पतंजली सोशल मीडिया प्रभारी रविकुमार शर्मा ,शहर प्रभारी विलास निकम ,कोषाध्यक्ष सुरेंद्र सबनीस, कार्यालयीन प्रभारी दिलीप माळी, रवी उपाध्ये गिरीश आरेकर ,डॉक्टर विलास देशमुख ,गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब इंगवले, साई सेवा संस्थेचे राजेंद्र मांगलेकर, पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सिताराम पाटील, पाडळी गावचे सरपंच तानाजी पालकर, माजी उपसरपंच सचिन सोहनी, सुभाष पालकर ,आनंदवन भवन हॉलचे मालक आनंदराव पाटील, हेमंत मुद्रणाचे सुनील नशिराबादकर , हेमंत कासार, योगशिक्षक बबन मोरे, एम आर शिंदे, मधुसूदन तांबेकर, संजय पाटील, आनंदराव कांबळे ,सुरेखा साखळकर, बि डी पाटील, अनंत गुरव, गिरीश आरेकर, गणपती पाटील, शांताराम पाटील, विजय पाटील,उत्तम पाटील, प्रताप जाधव, अमर साखळकर, मारुती पाटील, एम डी पाटील, विलास बागडी, पतंजली महिला समितीच्या माजी जिल्हा प्रभारी जयश्री नागवेकर, शहाजी ग्रुपचे सर्व सदस्य, भागातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी, योगसाधक व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.पतंजली भारत स्वाभिमानचे राज्य प्रभारी प्रीतीश लाड, अशोक भोईटे, जगन्नाथ पोद्दार यांनी सर्वांचे आभार मानले . ॲड .रवींद्र पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Comments
Post a Comment