संघर्ष योध्दा असणार्‍या महीलांचा सत्कार..


 कोल्हापूर(प्रतिनाधी):  शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वयाच्या ९३व्या वर्षी शेनी लावून त्यांची विक्री करून घराला हातभार लावणाऱ्या तसेच आपल्या खेळाचे छंद जोपासत एखाद्या तरुणीला देखील लाजवेल अशा जात्यावरील ओव्या, सुप  नाचवणे, घागर घुमावणे काटवट कणा,या खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या सोनाबाई विलास पवार आणि मीळेल ते काम करुन मुलगा आणि सून यांच्या मृत्यूनंतर आपल्या एक महीन्याच्या आणी अडीच वर्षांच्या लहान नातवंडांचे संगोपन करत त्यांच्या शिक्षणासह लग्न लावुन देण्यापर्यंत जबाबदारी पार पाडणार्‍या पंच्याऐंशी वर्षांच्या आनंदी शामराव चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी दोन्ही आदर्शवत मातांच्या हस्ते केक कापुन महीला दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.याप्रसंगी बोलताना पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरीता सासने यांनी समाजातील महिला वर्गाने सोनाबाई पवार व आनंदी चव्हाण यांच्या संघर्षमय कार्याचा आदर्श घेऊन प्रेरणा घ्यावी असे आहवान केले.यावेळी पद्माराजे महिला संघटनेच्या सचिव आरती वाळके, शोभा  मिठारी, शकुंतला सरनाईक, लक्ष्मी  येरुडकर, शालन चव्हाण, शशिकला गवळी, उषा महिंद्रकर , अर्पिता पावले , गीता भोसले, जयश्री गवळी यांच्यासह महीला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...