कोल्हापूरात खासदारांचा निषेध...


 कोल्हापूर शिवसेना शहर यांच्या वतीने खासदार निशिकांत दुबे यांचा जाहीर निषेध..

कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवसेना नेते युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या बद्दल खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत चुकीच्या पद्धतीचे अपमान जनक विधान केले, ज्या विधानात काही सत्य नाही, काही तथ्य नाही, यामुळे निशिकांत दुबे यांचे आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे , म्हणूनच कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने,  शहर प्रमुख मंजीत माने यांच्या नेतृत्वाखाली, दसरा चौक येथे निशिकांत दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसेनेच्या वतीने निदर्शने केली, तसेच निशिकांत दुबेनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला, यावेळी  निशीकांत दुबेंच्या निषेधार्थ कोल्हापूरी चप्पलाची प्रतिकृती केली होती हे कोल्हापूरी चप्पल लक्षवेधक ठरले.यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत,शहर प्रमुख विशाल देवकुळे, राजू जाधव, शुभम पाटील,दिनेश साळोखे, सुमित मेळवंकी, सागर साळोखे, रीमा देशपांडे, दीपा शिंदे, अभि दाबाडे,गोविंद वाघमरे, रुपेश रोडे, हर्षल पाटील, आदित्य हुलजी,अनिता ठोंबरे,कीर्ती जाधव, आदी उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...