कात्यायणी भेटीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न...

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचा यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे. रवीवारी  देवीची श्री शैल्यपुञी रुपातील देवीची आकर्षक पुजा बांधण्यात आली होती.ही पुजा श्रीपुजक महेश गुरव यांनी बांधली.दरम्यान रवीवारी सकाळी कात्यायणी देवीच्या भेटीचा पालखी सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भक्तगणांबरोबरच असंख्य महिला देखील सहभागी झाल्या होत्या. टाळ मृदंगाच्या गजरात आणि शंखध्वनीच्या गजरात पालखी सोहळा कळंबा येथुन कात्यायणी मंदीराकडे मार्गस्थ झाला. यावेळी कळंबा गावचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर, कळंबा तलावा शेजारी असणार्‍या वृक्ष गणेश  आणि कात्यायणी देवीच्या मंदिरात आरती सोहळा मोठ्या भक्ती भावाने पार पडला.यानंतर उपस्थीत भाविकांना सामाजीक कार्यकर्ते,विविध संस्था संघटनांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यामध्ये कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, उपसरपंच वैशाली टिपुगडे, सागर भोगम,दिलीप मीरजे,भारत पाटील,सुहास जंगम, उत्तम सुतार, सुरेश नाईक, विश्वास गुरव, शशिकांत तिवले, तानाजी पाटील,प्रकाश कदम,उत्तम जाधव यांच्यासह भक्तगण  सहभागी झाले होते.

Comments