कै.रामभाऊ चव्हाण यांच्या जयंती निमीत्य विविध सामाजीक उपक्रम संपन्न...
कोल्हापूर (प्रतिनिधी): कैलासवासी रामभाऊ चव्हाण यांनी कोल्हापुरात अनेक समाज कामे करत कोल्हापूरकरांच्या मनावर एक ठसा उमटवला.रामभाऊ चव्हाण यांच्याच माध्यमातून शिवसेना पक्षाची मुळे कोल्हापूरमध्ये रुजली गेली. त्यांचाच हा समाजकारणाचा वारसा घेऊन त्यांचे सुपुत्र सुजित चव्हाण हे देखील शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून कोल्हापुरात कार्यरत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रामभाऊ चव्हाण यांचे नातू आणि सुजित भाऊ चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण हे देखील समाजकारणामध्ये अग्रेसर दिसत आहेत. प्रसाद चव्हाण यांच्या माध्यमातून रामभाऊ चव्हाण दादा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबवले जात आहेत. आज रामभाऊ चव्हाण यांची जयंती निमीत्य सालाबाद प्रमाणे यावर्षीही रामभाऊ चव्हाण फाउंडेशन च्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रामभाऊ चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तसेच फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापुरातील 15 अंध जोडप्यांना संसार उपयोगी वस्तुंसह एक महीन्याचा शिधा देण्यात आला. तसेच सध्या नवजात, अनाथ बालकांना दुधाची कमतरता आहे अशा बालकांना लॅक्टोजण पावडर चे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना रामभाऊ चव्हाण फाउंडेशन अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांनी भविष्यकाळात देखील रामभाऊ चव्हाण फाऊंडेशनच्यावतीने विधायक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, गोकुळचे संचालक अजीत नरके, अजित चव्हाण, ज्योतीराम जाधव, जय चव्हाण ,यश चव्हाण ,अमित सासणे, विशाल चव्हाण, शरद नागणेश्वर, अभिजीत गायकवाड, आकाराम पाटील, प्रणव पवार, महादेव मोरे ,महेश पन्हाळकर, समर्थ माळी ,अथर्व इंगवले ,उल्हास देसाई, यांच्यासह रामभाऊ चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment