कळंबा गावाला कुस्तीची मोठी परंपरा...

 कोल्हापूर (प्रतिनीधी ): कळंबा गावाला कुस्तीची मोठी परंपरा असून कळंबा गावामध्ये तीन तालीम मंडळे आहेत. श्री महालक्ष्मी तालीम,श्री हनुमान तालीम,श्री राम तालीम या तालीमींच्या माध्यमातुन गावातील पन्नासहुन अधीक युवक मल्ल विद्या शिकत आहेत. आज पर्यंत या तीन तालीमींच्या माध्यमातून कळंबा गावातून शेकडो पैलवान तयार झाले आहेत. तसेच दरवर्षी यात्रेनिमित्त कुस्त्यांचे मैदान भरून येतील मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम कळंबा ग्रामस्थ करत असतात. याही वर्षी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या याञे निमीत्य कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कळंबा गावात अनेक  नव्या दमाचे मल्ल असून त्यांना शासनाकडून मदत मिळाल्यास ते राज्य आणि देशपातळीवर निश्चित चमकतील असा विश्वास सामाजीक कार्यकर्त्ये अरुण टोपकर आणी पैलवान सचिन कदम यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...