कळंब्यातील नागरीकांची एकजुट आणी अमाप उत्साह बनला कौतुकाचा विषय...

 

कळंबा ( प्रिया चौगले हिचा स्पेशल रिपोर्ट):  


करवीर तालुक्यातील कळंबा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यात्रा काळात सालाबाद प्रमाणे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. कळंबा ग्रामपंचायत आणि श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ यांच्या नियोजनातून यात्रेचे विविध कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पडत आहेत. यावर्षी 8 मे ते 15 मे दरम्यान ही याञा  संपन्न होत आहे.श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदीरात ज्ञानेश्वरी पारायण आयोजीत करुन याञेस सुरवात झाली.  श्रावण साळुंखे महाराज यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम पार पडला.तर श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या सौजन्याने शाहीर आनंदराव पाटील यांच्या शायरी गाण्याचा कार्यक्रमही संपन्न झाला. तर कळंबा गावातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून साकारलेल्या श्री महालक्ष्मी देवीची चांदीची उत्सव मूर्ती व चांदीची पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित्त करवीर तालुक्यातील महे येथील विठू माऊली संगीत सोंगी  भजनी मंडळाच्या वतीने सोंगी भजन ही सादर करण्यात आले. सालाबाद प्रमाणे श्री कात्यायणी देवीच्या भेटीचा पालखी सोहळा ही मोठ्या भक्ती भावात पार पडला तर मंदिरामध्ये होम हवनाचे कार्यक्रम देखील विधिवत पार पडले. तसेच घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला .श्री हनुमान भेटीचा मुख्य पालखी सोहळाही पार पडला.तर कळंबा येथील साई डेव्हलपर्सचे बाजीराव पोवार,प्रकाश कदम,दिगंबर पाटील यांच्या सौजन्याने राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथील भैरवनाथ संगीत सोंगी भजन मंडळाने आपला कलाविष्कार सादर केला. तर बजरंग दलाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित चित्रपट देखील यावेळी दाखवण्यात येणार आहे. तर यात्रा काळामध्ये श्री महालक्ष्मी मंदिरात सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तर गुरुमाऊली प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील राज युथ  फाउंडेशनच्या माध्यमातून सादर करण्यात आला. त्याचबरोबर कळंबा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या सौजन्याने श्री माऊली संगीत सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम देखील लोकप्रिय ठरला. तसंच विनोदी जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला.यात्रा काळातील हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळंबा गावातील तालीम मंडळे, तरुण मंडळे, सर्व भक्तगण, महिला बचत गट, महिला मंडळे व गावातील सर्व नागरीकांचे सहकार्य लाभले. तर कळंब्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध मंडळाच्या वतीने अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बकऱ्यांच्या टकरी, म्हशी पळवणे स्पर्धा पार पडल्या, तर  बैलगाडी- घोडागाडी शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसच भव्य कुस्तीचे मैदान देखील यावेळी पार पडले. या कुस्ती मैदानासाठी कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम यांनी तब्बल एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.या कुस्ती मैदानात राज्यस्तरीय मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलं होते. यामुळे कुस्ती शौकीनांना  एक प्रकारची मेजवानीच मिळाली.गेली आठरा वर्षे पार पडत असलेल्या ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या याञे निमीत्य कळंब्यातील नागरीकांची एकजुट आणी अमाप उत्साह माञ दरवर्षी कौतुकाचा विषय बनत आला आहे.याञेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातुन येणारे देवीचे लाखो भावीक आणी पै-पाहूणे कळंब्यातील सर्वच नागरीकांना जाताना याञेचे नियोजन करावे ते कळंबेकरांनीच अशी कौतुकाची शाब्बासकी देवुन जातात हे माञ नक्की..


Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...