कळंब्यातील नागरीकांना सदैव मदतीचा हात देणारी संस्था...



 
 कोल्हापूर( प्रतिनिधी):कळंब्यातील महालक्ष्मी भिशी ही सर्वसामान्य नागरिकांची आधारवड बनली आहे .2500 सभासद असणाऱ्या भिशीचे चेअरमन सुभाष सावंत आणि संचालक रोहीत मिरजे ,संभाजी तिवले ,श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या महालक्ष्मी भिशीची वाटचाल सुरू आहे. महिन्याला तब्बल 14 लाख रुपयांची वर्गणी या भिशीमध्ये जमा होते. तर  भिशीची वार्षिक उलाढाल दीड कोटीच्या आसपास आहे ,तर वार्षिक कर्ज वाटपाचा आकडा तब्बल पावणे दोन कोटी वर आहे पोचला आहे .1947 साली या भिशीची स्थापना झाली तर 1976 साली श्री महालक्ष्मी पतसंस्थेची स्थापना झाली आहे.या पतसंस्थेचे चेअरमन म्हणुन दिलीप मीरजे जबाबदारी सांभाळत आहेत. या संस्थेमध्ये सहा कर्मचारी असून कर्मचाऱ्यांच्या कडून सभासदांना अतिशय आपुलकीची वागणूक दिली जाते. सभासदांच्या कोणत्याही अडीअडचणीला ही भिशी कोणत्याही कागदपत्राच्या अटी शिवाय फक्त जामीनावर कर्ज पुरवठा करते. तसेच प्रत्येक सभासद हा एक आपल्या कुटुंबातील घटक आहे अशा प्रमाणे सर्वच संचालक मंडळ सभासदांना वागणूक  देत आल्यामुळे दिवसेंदिवस या भिशीची वाटचाल उंचावत चालली आहे. 

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...