आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून मंजित माने यांचे कौतुक...
मुंबई (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी युवासेनेच्या कोल्हापुरातील कार्याचा अहवाल मंजित माने यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.आमदार आदित्य ठाकरे यांनी मंजित माने यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केले. यावेळी मंजित माने यांनी युवा सेनेच्या आगामी उपक्रमांची माहिती आदित्य ठाकरे यांना दिली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी मंजीत माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

Comments
Post a Comment