प्रेम कुणावर करावे....
🔴 *Happy Valentine's Day..*
..."जमेल तसे प्रत्येकाने ...
.....कुणावर तरी प्रेम करावे" ...
कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण, दोन्हीकडे हि सेम करावे ..!!
प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!
आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!
प्रेम मुलावर/मुलीवर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!
प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!
प्रेम शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर...सचिन च्या खेळावर आणि
वारकऱ्यांच्या टाळावर हि करावे !
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!
प्रेम महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ... आणि , अगदी न चुकता स्वतःवर... जमेल तसे प्रेम करावे .!!!!!!
पण....
*"जमेल तसे प्रत्येकाने ........कुणावर तरी नक्कीच प्रेम करावे...!!!!"*
🔴 *Happy Valentine's Day..* 💕💞💞

Comments
Post a Comment