कोल्हापूरात गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा..
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापुरात आज गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी पेठ येथील पद्माराजे महिला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शकुंतला सरनाईक यांनी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यावेळी पद्माराजे महीला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे, आरती वाळके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले.दिवसभरात असंख्य भावीकांनी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी मिना सरनाईक, मनिषा साळोखे, मनाली सरनाईक, मंगल देसाई , गीता भोसले, शर्मिला भोसले, शालन चव्हाण, शकुंतला साळोखे, विद्या चौगले, राजश्री माने , मिना तिटवेकर यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

Comments
Post a Comment