कोल्हापूरातील पार्श्वनाथ बँकेत शिवजयंती उत्साहात साजरी...
कोल्हापूर ( प्रतिनिधी): कोल्हापूरातील पार्श्वनाथ बँकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष शंकर पाटील आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर चे अध्यक्ष विनोद मेहता तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील व उपस्थीत सर्व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.बँकेचे कुटुंब शंकर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपाध्यक्ष विक्रम शहा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला .याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग पाटील, शंकर पाटील यांची भाषणे झालीत.कार्यक्रमास संचालक अनिल शहा, विनोद ओसवाल, प्रमोद शहा,मौकतीक पाटील,पूनम शहा ,बाळासाहेब कांबळे व सर्व पदाधिकारी , अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.केवलसिंग रजपुत यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

Comments
Post a Comment