शहीदा मुल्लाणी यांची निवड..


 कोल्हापूर (प्रतिनिधी): जायंट्स  ग्रुप ऑफ करवीर सहेली कोल्हापूर यांचा दुसरा शपथविधी व पदग्रहण समारंभ नुकताच कोल्हापूरात पार पडला. जायंट्स  ग्रुप ऑफ करवीर सहेली कोल्हापूरच्या अध्यक्षपदी  शाहिदा शौकत मुल्लानी यांची निवड करण्यात आली.  नयना  बडकस , सुमन पवार यांची उपाध्यक्षा तर  नीता भाडळकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.हा ग्रुप 15 सदस्यांच्या असून वेगवेगळे सामाजीक उपक्रम राबवत असतो.यामध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्याविषयी जनजागृती,पर्यावरण संवर्धन, शालेय  विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देणे अशी समाज उपयोगी कार्ये करत असतो.या कार्यक्रमाला डॉक्टर राजकुमार पोळ, जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या अनुजा पाटील, प्रकाश वरणे,शरदचंद्र दिवाण,प्रकाश कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभश्री वरणे तर आभार शकुंतला मोरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...