कंदलगाव येथील तरुण मंडळांचा विनिता भोगम यांना जाहीर पाठींबा


 कळंबा (प्रतिनिधी): कळंबा जिल्हा परिषद मतदार संघात भाजपकडून महायुतीच्या विनिता सागर भोगम या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना कळंबा मतदार संघातील तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. विनिता भोगम यांना मत म्हणजे विकासाला मत हाच विचार करुन कंदलगाव येथील तरुण मंडळांनी भोगम यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये कंदलगाव येथील क्रांती चौक तरुण मंडळ, एकता फ्रेंड्स सर्कल व नेहरू युवा मंच या मंडळाचा समावेश आहे. या मंडळातील शेकडो कार्यकर्त्यांनी विनिता भोगम यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांचे रामचंद्र भोगम यांनी आभार मानले.




Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...