"डिजीटल पल्स आणि रीडींग फेअर " कार्यक्रम उत्साहात सपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): डी मार्ट CSR फौंडेशनच्या वतीने CSR फंडातून कोल्हापूर महापालीकेच्या प्राथमिक शिक्षण समिती कडील ७ शाळांमध्ये ' संगणक कक्ष व ग्रंथालय ' हा उपकम सुरू आहे. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून ते सातवी पर्यंत संगणकावरील विविध बाबी शिकवल्या जातात त्यामुळे विद्यार्थी संगणक साक्षर होण्यास मदत होत आहे .तसेच गोरगरिबांच्या मुलांना इयत्ता पहिलीपासून संगणक, इंटरनेट साररख्या सुविधांमुळे आधुनिक तंत्रज्ञान मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी वाढलेली आहे तसेच या उपक्रमांमध्ये ग्रंथालयही उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात . त्यामुळे विद्यार्थी वाचनप्रिय बनत चालले आहेत . अतिशय सुंदर असा उपक्रम डी मार्ट सीएसआर फाउंडेशन मधून सुरू आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य फर्निचर- पुस्तके इत्यादी डी मार्ट फाउंडेशन मधून पुरवली जातात' तसेच यासाठी शिक्षकांची ही नेमणूक केली आहे.डी मार्ट ने स्वतःच्या खर्चाने शिक्षकांची ही नेमणूक केली आहे . त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधून पहिलीपासूनच तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत . त्यामुळे या शाळांमध्ये पटसंख्या व गुणवत्ता वाढण्यास मदत होत आहे . याच उपक्रमातून वर्षातून एक वेळ सर्व शाळातील डी मार्ट चे शिक्षक एकत्र येऊन डिजिटल पल्स व रिडीग फेयर हा उपक्रम सादर करतात. यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभर आत्मसात केलेल्या तांत्रिक ज्ञानाची प्रात्यक्षिके सादर केली जातात . तसेच विद्यार्थ्यांनी मिळवलेले ज्ञानाचे उपयोजन सादर केले जाते . विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध प्रतिकृती, शैक्षणिक साहित्य या प्रदर्शनात मांडल्या जातात . तसेच वेगवेगळ्या प्रकारचे भाषिक खेळ यांचे नाट्यीकरण यांचे प्रदर्शन भरवले जाते असे प्रदर्शन यावर्षी मनपा टेंबलाईवाडी विद्यालय मध्ये भरवण्यात आले होते .या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ महानगरपालिकेचे उपायुक्त किरण कुमार धनवाडे यांच्या हस्ते व प्रशासनाधिकारी डी .सी . कुंभार यांच्या उपस्थितीत पार पडला .सदरच्या उपक्रमाला पालक वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात झालेली वाढ पाहून पालक आनंदित होत आहेत . यावेळी किरण कुमार धनवाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.महानगरपालिकेचा विद्यार्थी हा भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान सक्षमपणे हाताळणारा आदर्श नागरिक बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली व डी मार्टच्या या व्यावसायिक सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी डी मार्ट फाउंडेशनचे प्रकल्प सहाय्यक डेविड नऱ्होंना, फैसल पठाण हे उपस्थित होते. त्याचबरोबर डी मार्ट चे पर्यवेक्षक विजय पाटील, प्राथमिक शिक्षण समिती पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार तसेच शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, दिलीप शिरगावे, शाळेचे मुख्याध्यापक विलास पिंगळे आणि सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्तविक विलास पिंगळे यांनी केले तर सुत्रसंचालन मनिषा पांचाळ यांनी केले . आभार प्रभाकर लोखंडे यांनी मानले .
सागर चौगले,कोल्हापूर ब्रेकिंग-8483899521/9326499921

Comments
Post a Comment