नगरसेवक प्रसाद चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी आज निवड करण्यात आली. निवडीनंतर नगरसेवक प्रसाद चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत प्रसाद चव्हाण यांची भव्य मिरवणूक काढली. शिवाजी पेठेतील वेताळ तालमीत मिरवणूक आल्यानंतर या ठिकाणी नगरसेवक प्रसाद चव्हाण यांनी आपले वडील सुजित चव्हाण यांची गाळात भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला. यानंतर त्यांनी कुटुंबीयांबरोबर आपला आनंद व्यक्त केला.हा क्षण पाहण्यासाठी स्वर्गीय रामभाऊदादा चव्हाण आणि शिवाजीराव चव्हाण हवे होते अशी प्रतिक्रिया कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली. यामुळे काही काळ या ठिकाणी वातावरण भावुक झालं होते.तर गुलालाची उधळण करत प्रसाद चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण,अजित चव्हाण,गणेश रांगणेकर यांच्यासह चव्हाण कुटुंबीय आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment