पक्षाने आदेश दिल्यास मनसेकडून उत्तरची निवडणूक लढवणार: संजय पाटील
कोल्हापूर:
अखिल भारतीय किसान काँग्रेसचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी आपल्या परिवर्तन संघटनेसह त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यरत असणाऱ्या तीन कामगार संघटना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराला पुढे नेण्यासाठी तसेच सत्तेसाठी कधीच कोणत्याही पक्षाशी तडजोड न न करण्याच्या त्यांच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून आपण पक्ष प्रवेश करत असल्याचे संजय पाटील यांनी सांगीतले. भविष्यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभेचा आमदार हा महाराष्ट्र निर्माण सेनेचा असेल त्यासाठी शहरामध्ये पक्ष वाढवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. पक्षाने आदेश दिल्यास आपण उत्तर विधानसभा निवडणूक लढवू असेही संजय पाटील म्हणाले. कोल्हापूर दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची नव्याने बांधणी केली जाणार आहे तसेच वार्डनिहाय पदाधिकारी निवडी त्याचप्रमाणे पक्षांतर्गत असणाऱ्या सेलची पुनर्बांधणी लवकरच केली जाणार आहे .संजय पाटील यांच्या निवडीसाठी मनसेचे संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांचे सहकार्य मिळाले.पाटील यांची नियुक्ती शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी केली .या निवडीसाठी प्रसाद पाटील, विजय करजगार, निलेश धूम्मा, गणेश मोरे, रत्नदीप चोपडे यांचे सहकार्य लाभले.

Comments
Post a Comment