आंतरराष्ट्रीय बालिका दिवस प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथील गर्ल्स हायस्कूल येथे उत्साहात साजरा
आंतरराष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या दोन्ही स्पर्धांना विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ सविता पाटील संचालिका प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर,यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्त्री ही इंद्रधनुष्य प्रमाणे सर्वगुण संपन्न आहे. तिच्या मध्ये दया,ममता,प्रेम,क्षमा शांती,मांगल्य आणि पावित्र्य हे गुण असून ती खूप सहनशील आहे. महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जवाबदारी निभावत आहेत. यावेळी त्यांनी अंतराळ क्षेत्र,राजकारण,सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलाप्रती अभिमान व्यक्त करत विद्यार्थिनींना सबला बनण्याचे आवाहन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय विभागीय कार्यालय कोल्हापूर चे अधिकारी मा. प्रा. श्री प्रमोद खंडागळे यांनी या प्रसंगी मुलींना शुभेच्छा दिल्या व मुलींनी शासकीय योजनांचा उपयोग करून सक्षम बनले पाहिजे असे सांगितले. केंद्रीय संचार ब्यूरो द्वारा आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. ह्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षदा गोसावी, वालचंद नागरगोजे, जो. एस.पाटील, सौ व्ही आर पाटील , काटे मॅडम, आणि इतर शिक्षक उपस्थित होते. रोटरी चा नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाल्या बददल महाराष्ट्र हायस्कूल मधील मराठी विषयाचे शिक्षक श्री डी एस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जर्मनी मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी शिक्षणासाठी निवड झालेल्या शाळेच्या माझी विद्यार्थिनी वैभवी जाधव यांचा ही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित होते.

Comments
Post a Comment