सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाची भव्य मिरवणुकीने सांगता


 कोल्हापूर : राजेंद्र नगर येथील स्वराज्य तालीम मंडळच्या वतीने सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन 20 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी संपन्न झाला. मंगळवार दि. 24 रोजी गौतम बुद्ध, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक राजेंद्र नगर ते बुद्ध गार्डन शास्त्रीनगर पर्यंत काढण्यात आली.

या मिरवणुकीचे उद्घाटन भारतीय बौद्ध समाज कोल्हापूरचे अध्यक्ष रंगराव पांडे, मंडळाचे संस्थापक सुखदेव बुध्याळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. सामुदायिक पंचशील ग्रहण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.या मिरवणुकीमध्ये 120 लेझीम खेळाडूंचा ताफा व पारंपारिक वाद्याचा समावेश होता. विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धांच्या व जय भीम च्या जयघोशात हि मिरवणूक संपन्न झाली.

 मिरवणुकीला राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे ,अजय कुरणे, माजी पोलीस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, यांची प्रमुख उपस्थीती होती.या मिरवणुकीत पंकज आठवले, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रवीण बनसोडे, लक्ष्मण कांबळे,सुरेश आठवले, अशोक शिवशरण, चंद्रकांत शिवशरण, शिवराम बुध्याळकर, रंगनाथ शिवशरण, भारत प्रक्षाळे, रविंद्र भोपळे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव नागटिळे, निलेश बनसोडे, प्रवीण वाघमारे, राजू शिंदे, दयानंद गालफाडे,अबाल वृद्ध, माता- भगिनी, भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती उमेदवारनिहाय पडलेली मते.

कोल्हापूर जिल्हापरिषदेचे विजयी उमेदवार,त्यांचा मतदार संघ व पक्ष याचा तपशील..

कोल्हापूरातील 'तो'प्रसिध्द वकील कोण?शहरात रंगली चर्चा...